शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा राज्यभरातील ५२ हजार रेशन दुकानदार १ जूनपासून धान्य वितरण थांबविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 21:37 IST

रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र त्याला शासनाने नकार दिला आहे..

ठळक मुद्देराज्यातील रेशनिंग दुकानदारांना, त्यांच्या मदतनिसांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही रेशन दुकानदारांनी दुकाने आहेत सुरू

पिंपरी : कोरोनाच्या महामारीत रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र त्याला शासनाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील रेशनिंग दुकानदार १ जूनपासून धान्य खरेदी तसेच विक्री थांबविणार आहेत. ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना याबाबत निवेदन दिले आहे. राज्यातील रेशनिंग दुकानदारांना तसेच त्यांच्या मदतनिसांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे वारंवार केली. त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविल्याचे २८ एप्रिल रोजी सांगण्यात आले. मात्र २९ मे रोजी निघालेल्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार कोरोना विषाणूच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य तसेच अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले. परंतु रास्त भाव रेशनिंग दुकानदार व त्यांचे मदतनीस यांचा त्यात समावेश करण्यात आला नाही. रेशन दुकानदार नागरिकांशी थेट संपर्कात येतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही रेशन दुकानदारांनी दुकाने चालू ठेवली आहेत. गरजू ग्राहक व लाभार्थ्यांना त्यांच्याकडून धान्य वितरीत केले जात आहे. त्यामुळे रेशन दुकानादार व त्यांच्या मदतनिसांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. शासनाचे थेट कर्मचारी नसले तरी ते शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच धान्य वितरण करतात. या दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येईल, त्यामुळे विमा संरक्षण देण्यात यावे. अन्यथा राज्यभरातील ५२ हजार रेशन दुकानदार सोमवार, दि. १ जूनपासून शासनाच्या गोदामातून धान्य उचलणार नाहीत किंवा धान्याचे वितरण देखील करणार नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारfoodअन्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस