शहरं
Join us  
Trending Stories
1
NYC Helicopter Crash: हेलिकॉप्टर क्रॅश झालं अन् थेट नदीत पडलं, अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
2
दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार
3
'ज्या दिवशी परतफेड करेन, त्या दिवशी 'तो' व्हिडीओ डिलीट करेन'; नितेश राणेंचा इशारा कुणाला?
4
Stock Market Today: शेअर बाजाराची दमदार सुरुवात, निफ्टीत ३५० अंकांची उसळी; Tata Motors सुस्साट, IT स्टॉक्सही तेजीत
5
सलमान खानचं कसं आहे देओल कुटुंबाशी नातं; सनी देओल म्हणाला, "आमच्यात अनेक वर्षांपासून..."
6
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला १८ दिवसांची NIA कोठडी, वकील म्हणाले...
7
रतन टाटा यांच्या बंगल्यात कोण राहणार, नोएल टाटा येणार का? १३ हजार स्क्वेअर फूटांत पसरलाय 'हलेकई'
8
"भारत विसरला नाही, PM मोदींनी न्याय केला"; २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणताच रोहित शेट्टीची पोस्ट
9
राशीभविष्य, ११ एप्रिल २०२५: आर्थिक फायद्याचा दिवस, वैचारिक समृद्धी वाढेल, वाणीवर संयम ठेवा!
10
गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा ५० हजार दंड; महारेराचा बिल्डरांना सज्जड इशारा
11
१५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर २६/११चा आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात
12
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पूर्ण पगार; कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर प्रशासन ताळ्यावर
13
विशेष लेख: देशात दर साडेआठ लोकांमागे भाजपचा एक माणूस!
14
पार्किंगवर ताेडगा काढण्यासाठी धोरण; राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात
15
शाश्वत शहरी विकासासाठी ‘वहन क्षमता सर्वेक्षण’ करा; उच्च न्यायालयाने बजावली राज्य सरकारला नोटीस
16
टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव
17
RCB vs DC : केएल राहुल भारीच खेळला! पण या २० वर्षांच्या पोरामुळं विराटसह आरसीबीचा संघ फसला!
18
आजचा अग्रलेख: काँग्रेसची विश्रांती आणि निवृत्ती
19
आंबा बागायतदारांना ‘जीआय’चे संरक्षण; बनावट हापूस ओळखणे सहज शक्य होणार
20
विशेष लेख: एकतर तुरुंगात जा, नाहीतर अमेरिका सोडून चालते व्हा!

"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...", सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:32 IST

'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे.

राज्यातील फडणवीस सरकारमध्ये यावेळी मंत्रीपद न मिळालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी अद्यापही गेलेली दिसत नाही. ते जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा आपल्या मनातील खदखद व्यक्त करायला विसरत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. 'जर मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...,' असे विधान करत मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद  पुन्हा एकदा बोलून दाखवली. ते नाशिक येथे एका व्याख्यानमालेत बोलत होते.

खरे तर, 'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे. त्यांनी सरकारसंदर्भात केलेल्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल..." -सुराना यांच्या सोबत झालेल्या संवादाचा धागा पकडत मुनगंटीवार म्हणाले, "जेव्हा सुरानाजी म्हणाले की, जो या व्याख्यानमालेला येतो त्याचे प्रमोशन होते. दडपण तर निघाले पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचे असेल, तर सरकार कायम रहायला हवे आणि माझे सरकार कायम राहायला हवे हे खरे आहे, तेवढेच उद्याच्या आणि परवाच्या वक्त्याचे नाव बघितल्यानंतर, भीती निर्माण झाली की, जर मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल आणि जोजो येतो त्याला प्रमोशन द्यायचे असेल, तर या दोघांना पक्षात घ्यावे लागेल." या व्याख्यानमालेत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच शोभा फडणवीस यांनी दिली होती समज, म्हणाल्या होत्या... -यावेळी चंद्रपुरात भाजपच्या वर्धापन दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम झाले. माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला. तसेच स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभाताई फडणवीस- हंसराज अहीर यांच्यासोबत कार्यक्रम घेतला. एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना नाव न घेता धारेवर धरले होते. त्या म्हणाल्या होत्या, "जेव्हा आपला पक्ष केंद्रात आहे, जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रभरात आहे, असे असताना या जिल्ह्यात पक्षात भांडणं व्हावीत? येथे एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाहीत? का दुसरा मेळावा घेता? यामुळे लोकांच्या मनात काय  निर्माण होतं? हा चंद्रपूरचा आमदार आहे. चंद्रपूरला कार्यक्रम घेणे त्याचे काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचे होते. लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत. पण इथे आपली भांडणं झाली, तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही? आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही."असे शोभा फडणवीस यांनी म्हटले होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाState Governmentराज्य सरकार