शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स--राज्यातील पहिलेच शहर

By admin | Updated: December 19, 2014 00:31 IST

’कविता गुप्ता यांची घोषणा : निर्यात वृद्धीसाठी केंद्र सरकारकडून निवड,

इचलकरंजी : केंद्र सरकारने इचलकरंजी शहराची ‘टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स’ म्हणून निवड केली असून, या परिसरातील उद्योजकांनी त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करील, अशी घोषणा केंद्र सरकारच्या अतिरिक्त महासंचालिका कविता गुप्ता यांनी केली. टाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्स म्हणून निवड झालेले इचलकरंजी हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर आहे.केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयाच्यावतीने निर्यात बंधू योजनेअंतर्गत झालेल्या उद्योजक-व्यापाऱ्यांच्या बैठकीत कविता गुप्ता बोलत होत्या. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील आपल्या प्रमुख भाषणात महासंचालिका गुप्ता म्हणाल्या, निर्यात वृद्धीसाठी आज ही बैठक आयोजित केली आहे. आपली दर्जेदार उत्पादने निर्यात करण्यासाठी उद्योजकांनी एक पाऊल पुढे टाकले तर सरकार दोन पावले पुढे येईल. सूत व कापड उद्योजकांच्या सोयीसाठी सामूहिक सेवा केंद्र उघडल्यास सरकार एक खिडकी योजनेप्रमाणे उद्योजक-व्यापाऱ्यांना सहकार्य करेल. सुरूवातीला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी स्वागत केले व प्रास्ताविकात येथील वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नजीकच्या वर्षात इचलकरंजीतून प्रती महिना २५ लाख मीटर कापड निर्यात करण्याची ग्वाही कोष्टी यांनी दिली. विदेश व्यापार संचनालयाचे उप महासंचालक आर. सी. कालरा म्हणाले, कपड्याबरोबर चांदीचे दागिने, फौंड्री-इंजिनिअरिंग उद्योगाची उत्पादने सुद्धा येथून निर्यात करण्यासाठी उद्योजक-व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.माजी मंत्री प्रकाश आवाडे, डी. जी. लोकेश, नीतेश सुरी, रवी कुमार, रत्नाकर बॅँकेचे अमित राज, भारतीय निर्यात ऋण गॅरंटी निगमचे वि. भा. सावर्डेकर, पिडीएक्सएलचे संचालक सुनील पाटील, आदी उपस्थित होते.तीन वर्षांच्या सर्वेक्षणानंतर निवडटाऊन आॅफ एक्स्पोर्ट एक्सलन्ससाठी इचलकरंजीची निवड करताना गेल्या तीन वर्षांचा मागोवा घेण्यात आला. तेथील विविध प्रकारच्या कपड्यांची वार्षिक निर्यात ७५० कोटी रुपयांहून अधिक असल्यामुळेच इचलकरंजीची निवड झाल्याचे महासंचालिका कविता गुप्ता यांनी स्पष्ट केले.