शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मी देशाचा सदैव ऋणी राहीन!

By admin | Updated: May 17, 2014 22:36 IST

कठीण काळात सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.

कृतार्थ मनमोहन सिंग यांचे अखेरचे भाषण : जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतात
 
कठीण काळात  सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. राष्ट्रपतींकडे आपल्या सरकारचा राजीनामा सुपूर्द करण्याआधी डॉ. सिंग यांनी आपल्या मितभाषी स्वभावाला साजेसे असे राष्ट्राला उद्देशून अखेरचे भाषण केले व देशवासीयांनी दिलेल्या उदंड प्रेमाबद्दल आभार मानले. महान राष्ट्र म्हणून जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतामध्ये निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करीत असतानाच त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्यांनी सत्तेवर येणा:या नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या.
आयुष्याची 6क् वर्षे देशसेवेसाठी वेचलेल्या डॉ. सिंग यांनी सार्वजनिक जीवनातून  ‘एक्ङिाट’ घेण्यापूर्वी केलेले हे शेवटचे भाषण असे:
‘माङया प्रिय देशवासीयांनो, भारताचा पंतप्रधान या नात्याने मी आपणास हे शेवटचे संबोधित करीत आहे. दहा वर्षापूर्वी ही जबाबदारी माङयावर सोपविली गेली तेव्हा चिकाटी हे साधन हाती घेऊन, मार्गदर्शनासाठी सत्यरूपी प्रकाशशलाका समोर ठेवून व नेहमी हातून योग्य तेच काम होण्याची प्रार्थना मनी ठेवून मी या कामाला सुरुवात केली होती.
आज मी पायउतार होत आहे, पण परमेश्वराकडून दिल्या जाणा:या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करीत असताना, जनतेने दिलेल्या पदावर बसणा:या प्रत्येकाला व सरकारांनाही जनतेच्या दरबारातील निकालास सामोरे जावे लागते, याची मला कल्पना आहे.
देशवासीयांनो, तुम्ही दिलेला निकाल आमच्यापैकी प्रत्येकाला शिरसावंद्य आहे. नुकत्याच संपलेल्या निवडणुकांनी आपल्या लोकशाहीचा पाया अधिकच भक्कम झाला आहे.
याआधीही मी अनेक वेळा म्हटल्याप्रमाणो, माङो जीवन व सार्वजनिक पदावरील कार्यकाळ हे खुले पुस्तक आहे. या आपल्या महान राष्ट्राची होता होईतो सेवा करण्याची मी शिकस्त केली आहे. गेल्या दहा वर्षात एक राष्ट्र म्हणून आपण अभिमान वाटावा असे यश व उपलब्धी अनेक बाबतीत साध्य केली आहे. आज भारत अनेक बाबतीत, दहा वर्षापूर्वी होता त्याहून कितीतरी अधिक बलवान राष्ट्र झाला आहे. या सर्व यशाचे श्रेय तुमचेच आहे. पण तरीही या देशात अजूनही कितीतरी विकासक्षमता सुप्तावस्थेत आहे व ती वापरण्यासाठी आपण सर्वानी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.
पदावरून दूर होताना, तुम्ही दिलेले प्रेम व ममत्वाच्या स्मृती माङया मनात चिरकाल राहतील. मला आयुष्यात जे काही मिळाले ते सर्व या महान देशानेच दिलेले आहे. फाळणीने पोळलेल्या माङयासारख्या उपेक्षित व्यक्तीला प्रगती करून उच्च पद भूषविण्याचे बळ याच देशाने दिले. देशाचे माङयावरील हे ऋण कधीही फेडता न येणारे तर आहेच; पण जे कायम एक अलंकार म्हणून मिरवावे असेही आहे. मित्रंनो, मला भारताच्या भवितव्याबद्दल उदंड विश्वास आहे. उदयोन्मुख जागतिक अर्थव्यवस्थेचे ऊर्जास्थान म्हणून भारताने भूमिका बजावण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असे माङो ठाम मत आहे. परंपरा व आधुनिकता आणि एकता व विविधता यांचा मेळ घालून आपला देश जगाचा मार्गदर्शक ठरू शकतो. या देशाची सेवा करता आली हे मी भाग्य समजतो. माझी याहून जास्त काही अपेक्षाही नाही. नव्या सरकारला त्यांच्या कामात मी सुयश चिंतितो व आपल्या देशास उत्तरोत्तर यश मिळत राहो, अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद, जयहिंद.
 
-सखोल अध्ययन व दूरदृष्टीने आर्थिक क्षेत्रत आपल्या कर्तृत्वाचे मानदंड निर्माण करणा:या डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद एक दशक सांभाळल्यानंतर शनिवारी त्याचा राजीनामा दिला. 
- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुस:यांदा पंतप्रधान बनण्याचा मान फक्त डॉ. सिंग यांच्याच वाटय़ाला आला. संपुआ सरकारच्या दोन मोठय़ा घोटाळ्यांचा परिणाम त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कामावर मात करणारा ठरला.
-1991 साली देश आर्थिक संकटातून वाटचाल करीत होता तेव्हा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. सिंग यांची अर्थमंत्री म्हणून वर्णी लागली. त्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढले. 
-सहकारी पक्षांच्या विरोधाला तोंड देत अमेरिकेसोबत अणुऊर्जा करार करून त्यांनी भारताविरुद्ध लागलेल्या र्निबधांना संपविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. 
-सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर डॉ. सिंग हे पहिले शीख पंतप्रधान बनले. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी शपथ दिली होती.