मोबाईलसाठी पत्नीने विळ्याने कापले पतीचे ओठ; महाराष्ट्रातील थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:42 AM2021-10-16T11:42:13+5:302021-10-16T11:42:27+5:30

पत्नीविरूद्ध गुन्हा : लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील घटना 

Husband's lips cut by wife for mobile; A shocking incident in Maharashtra Bhandara | मोबाईलसाठी पत्नीने विळ्याने कापले पतीचे ओठ; महाराष्ट्रातील थरकाप उडवणारी घटना

मोबाईलसाठी पत्नीने विळ्याने कापले पतीचे ओठ; महाराष्ट्रातील थरकाप उडवणारी घटना

Next

मासळ (भंडारा) : आजच्या मोबाईल युगात मोबाईलचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलने वेड लावले आहे. कित्येकदा जीव सुध्दा गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.  अशीच एक अचंबित करणारी घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे घडली. येथील एका विवाहित महिलेने मोबाईल परत द्यावा या कारणावरून पतीवर विळ्याने हल्ला करुन ओठ कापण्याची घटना घडली. 

मासळ येथील खेमराज बाबुराव मुल (४०) यांचा स्वतःचा मोबाईल नादुरुस्त  झाल्याने त्यांनी पत्नीचा मोबाईल घेतला. परंतु दोन दिवस उलटून सुध्दा पतीने मोबाईल परत न केल्याने १४ आँक्टोबरला मोबाईलवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पत्नीने घरातील विळा खेमराज यांना फेकून मारला. त्यामध्ये विळा खेमराजच्या तोंडाला लागुन ओठ कापल्या गेले. जखमी अवस्थेत खेमराज लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. खेमराज यांच्या तोंडी बयान व वैद्यकीय तपासणीनंतर शुक्रवारी पत्नीविरुद्ध लाखांदुर पोलिस ठाण्यात भादंविच्या ३२४ व ५०४ कलमान्वये गुन्हा  दाखल करण्यात आाला आहे. तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे करत आहेत.

Web Title: Husband's lips cut by wife for mobile; A shocking incident in Maharashtra Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Mobileमोबाइल