शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पूर्णा’वर हुंदके

By admin | Updated: June 4, 2014 01:13 IST

ज्येष्ठ नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव दिल्लीहून रात्री पावणोआठच्या सुमारास वरळी येथील पूर्णा या त्यांच्या निवासस्थानी आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

मुंबई : ज्येष्ठ नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव दिल्लीहून रात्री पावणोआठच्या सुमारास वरळी येथील पूर्णा या त्यांच्या निवासस्थानी आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. 
आपल्या पतीच्या पार्थिवाजवळ प्रज्ञा मुंडे येऊन बसल्या तेव्हा सगळे वातावरण शोकमय झाले. त्यांच्या तिन्ही कन्या (पंकजा, प्रीतम, यशश्री) त्यांना येऊन बिलगल्या आणि उपस्थित सगळ्यांनाच अश्रू आवरणो कठीण झाले. मुंडे यांची भाची खा. पूनम महाजन त्यांचे बंधू राहुल आणि आई रेखा महाजन यांची अवस्था वेगळी नव्हती. एकमेकांना धीर देताना सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटत होता. 
गेली अनेक वर्षे मुंडे यांच्याबाबत आत्यंतिक आदर बाळगलेले पूर्णा इमारतीतील रहिवाशी, कर्मचारी, चालक यांना गहिवरून आले.  मुंडे यांचे मार्गदर्शक प्रमोद महाजन, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाचे दु:ख पूर्णा सोसायटीने अनुभवले आह़े इमारतीच्या आवारात उभारलेल्या मंडपात मुंडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुयुरप्पा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, गृहमंत्री आर.आर.पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण राजेंद्र दर्डा, वस्नेद्योग मंत्री नसीम खान, रोहयो मंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री सतेज पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे खा. संजय राऊत, आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, सुभाष देसाई, अभिनेत्री खा. हेमामालिनी, बिहारमधील आमदार देवेश ठाकूर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांनी श्रद्धांजली वाहिली. राजेंद्र दर्डा यांनी प्रज्ञा मुंडे यांना भेटून सांत्वन केले. ‘लोकमत’ परिवारातर्फे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी श्रद्धांजली वाहिली. पूर्णा सोसायटीच्या आवारात आणि बाहेरही कार्यकत्र्यानी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणा कार्यकर्ते देत होत़े (विशेष प्रतिनिधी)