अजित दादा असताना विलिनीकरणासंदर्भात नेमक्या किती बैठका झाल्या? अनिल देशमुखांनी आकडाच सांगितला! केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:21 IST2026-02-03T20:21:05+5:302026-02-03T20:21:57+5:30

हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे, कोणत्या तारखेला बैठक झाली अजित दादांबरोबर? किती वाजता बैठक झाली? त्या बैठकीला कोण कोण होतं? त्या बैठकीमध्ये काय ठरलं? या सर्व गोष्टी सांगू."

How many meetings were held regarding merger during Ajit Dada's tenure Anil Deshmukh revealed the numbers Made a big claim | अजित दादा असताना विलिनीकरणासंदर्भात नेमक्या किती बैठका झाल्या? अनिल देशमुखांनी आकडाच सांगितला! केला मोठा दावा

अजित दादा असताना विलिनीकरणासंदर्भात नेमक्या किती बैठका झाल्या? अनिल देशमुखांनी आकडाच सांगितला! केला मोठा दावा


अजित पुवारांच्या अपघाती निधनानंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनिकरणाच्या चर्चेने अधिकच जोर दरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत, अशी अजित दादांचीच इच्छा होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

अजितदादा हयात असताना विलिनीकरणासंदर्भात अनेक बैठका पार पडल्या. साधारण किती बैठका पार पडल्या? त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही, अशा पद्धतीची वक्तव्ये समोर येत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष काही बैठकांमध्ये उपस्थित होता का आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "अजितदादांबरोबर जवळजवळ चौदा बैठका झाल्या. अनेक बैठकांना मीही उपस्थित होतो. आमचे बाकी सहकारीसुद्धा होते. पण आता यासंदर्भात सध्या तरी दुखवट्याचा काळ सुरू आहे. हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे, कोणत्या तारखेला बैठक झाली अजित दादांबरोबर? किती वाजता बैठक झाली? त्या बैठकीला कोण कोण होतं? त्या बैठकीमध्ये काय ठरलं? या सर्व गोष्टी सांगू."

"सुप्रिया सुळे आणि शरद पवार देखील काही बैठकांना उपस्थित होते. त्यामुले सर्वां माहिती आहे त्यांच्या नेत्यांनाही माहीत आहे," असेही देशमुख यांनी सांगितले. यावर, अजित पवारांची नेमकी खद-खद काय होती? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "असे आहे की या सर्व गोष्टी दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. आता या गोष्टी सांगणे हे योग्य होणार नाही. दुखवट्याच्या काळात अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत," असे देशमुख म्हणाले.
 

Web Title : देशमुख: अजित दादा के रहते एनसीपी विलय पर 14 बैठकें हुईं

Web Summary : अनिल देशमुख का दावा है कि अजित पवार के जीवित रहते एनसीपी विलय को लेकर 14 बैठकें हुईं। उन्होंने शोक अवधि के बाद उपस्थित लोगों और लिए गए निर्णयों सहित विवरण देने का वादा किया।

Web Title : Deshmukh: 14 Meetings on NCP Merger When Ajit Dada Was Alive

Web Summary : Anil Deshmukh claims 14 meetings occurred regarding NCP merger while Ajit Pawar was alive. He promises details after the mourning period, including attendees and decisions made.