शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचएमएस’ना ‘एमबीबीएस’चे अधिकार कसे?; भाजपच्या डाॅक्टर आमदारांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:17 IST

दुसरीकडे शेकडो गावे, तांडे, पाड्यांवर एकही एमबीबीएस डॉक्टर नाहीत, कोणतीही पॅथी ही लहानमोठी नसते. 


मुंबई : होमिओपॅथीचा अभ्यास करणाऱ्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार द्यावा की देऊ नये, यावरून भाजपच्या दोन डॉक्टरआमदारांमधील मतभिन्नता विधानसभेत सोमवारी दिसून आली. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसारच सरकार निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. 

भाजपचे डॉ. तुषार राठोड हे ॲलोपॅथीचे डॉक्टर, तर याच पक्षाचे दुसरे आमदार डॉ. संजय कुटे हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राठोड यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास अनुमती देण्यास विरोध दर्शविला. दुसरीकडे शेकडो गावे, तांडे, पाड्यांवर एकही एमबीबीएस डॉक्टर नाहीत, कोणतीही पॅथी ही लहानमोठी नसते. 

निदान व उपचार पद्धती वेगळी असतानाही...
सर्वांचा मुळाधार हा आयुर्वेदातच आहे, असे सांगत डॉ.संजय कुटे यांनी डॉक्टरांच्या कमतरतेवर आंतरपॅथीची प्रॅक्टिस हा उपाय आहे, असे सांगितले. भाजपचेच अतुल भोसले यांनी मात्र विरोध दर्शविला.

ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीतील निदान व उपचाराची पद्धत पूर्णत: वेगळी आहे, केवळ वर्षाच्या अभ्यासक्रमावर साडेपाच वर्षे ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम करणाऱ्यांच्या समकक्ष ‘बीएचएमएस’ना नेऊन ठेवणे योग्य नाही, असे डॉ. तुषार राठोड म्हणाले. 

३३ संस्थांमध्ये सोय
त्यावर, राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले की, साडेपाच वर्षांचा ‘बीएचएमएस’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर मर्यादित स्वरूपात ॲलोपॅथी उपचाार करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ८ हजार डॉक्टरांनी नोंदणी केली.

३३ संस्थांमध्ये हा एक वर्षाचा  अभ्यासक्रम शिकविला जातो. हा तीनशे तासांचा अभ्यासक्रम आहे.  मात्र, ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी त्यास विरोध दर्शविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकार निर्णय घेईल.

टॅग्स :doctorडॉक्टरMLAआमदार