Ajit Pawar Plane Crash Death:बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राने एक धडाडीचा नेता गमावलाच, पण या अपघातात एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही प्राणज्योत मालवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे या दुर्दैवी घटनेचे मृत्यूमुखी पडले आहेत. अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून ते सावलीसारखे नेहमी त्यांच्यासोबत असायचे, मात्र या अपघातात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलातील २००९ च्या बॅचचे कर्मचारी होते. मागील काही काळापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात होते. एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख पार पाडत असत.
शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली साथ
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत अजित पवार झंझावाती प्रचार करत होते. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघताना विदीप जाधव त्यांच्यासोबत विमानात बसले. त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरेल. लँडिंग दरम्यान विमान आदळून झालेल्या स्फोटात विदीप जाधव यांचाही जागीच मृत्यू झाला.
पोलीस दलात शोककळा
विदीप जाधव यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबई पोलीस दलात आणि त्यांच्या सहकारी मित्रांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. कर्तव्यावर असताना शहीद झाल्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल पोलीस दलाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
विमानात विदीप यांच्यासह कोण होते?या भीषण अपघातात विदीप जाधव यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला.
अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.
पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.
कॅप्टन साहिल मदन: मुख्य पायलट.
सुमित कपूर: सह-पायलट.
Web Summary : Tragedy struck as Ajit Pawar's dedicated PSO, Videep Jadhav, perished in the Baramati plane crash. Jadhav, a Mumbai police officer, was known for his unwavering commitment to Pawar's security. His sudden demise has cast a pall of sorrow over the police force. Four others also died in the crash.
Web Summary : बारामती विमान दुर्घटना में अजित पवार के समर्पित सुरक्षाकर्मी विदीप जाधव की दुखद मृत्यु हो गई। मुंबई पुलिस के अधिकारी जाधव अपनी कर्तव्यनिष्ठा के लिए जाने जाते थे। उनके निधन से पुलिस बल में शोक की लहर है। विमान में सवार अन्य चार लोगों की भी मौत हो गई।