शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

अश्व धावला उभ्या रिंगणी!

By admin | Updated: July 24, 2015 01:30 IST

विठुनामाचा सुरू असलेला अखंड नामजप, आल्हाददायक असलेले सकाळचे कोवळे ऊन अशा उत्साही वातावरणात देहूहून आषाढी एकादशी सोेहळ्यासाठी मार्गक्रमण करीत असलेल्या संत

संदीप लोणकर/शहाजी फुरडे-पाटील, माळीनगरविठुनामाचा सुरू असलेला अखंड नामजप, आल्हाददायक असलेले सकाळचे कोवळे ऊन अशा उत्साही वातावरणात देहूहून आषाढी एकादशी सोेहळ्यासाठी मार्गक्रमण करीत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सकाळी माळीनगरमध्ये पहिले उभे रिंगण झाले़ सुमारे अडीच किमी लांब रस्त्यावरच झालेल्या या रिंगण सोहळ्याचा उत्साह घेऊन पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी लवंगकडे मार्गस्थ झाला़सहकार पंढरी अकलूज येथील मुक्काम उरकून पालखी सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ झाल्यानंतर माळीनगरवासीय व वारकरी उभ्या रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पालखी सोहळ्याची वाट पाहत थांबलेले होते़ तोपर्यंत रथापुढील व रथापाठीमागील दिंंड्या रस्त्याच्या कडेला एका रेषेत उभ्या राहून विठ्ठलनामाच्या भजनात तल्लीन होऊन नाचत होते़ काकासाहेब चोपदार यांनी पाहणी केल्यानंतर माळीनगर साखर कारखान्याच्या समोरच्या रस्त्यावर मध्यभागी उभ्या असलेल्या रथाच्या पुढे व पाठीमागील बाजूस वारकरी तल्लीन होऊन नाचत असतानाच चोपदारांनी अश्व रिंगणात सोडला़ रथाच्या पुढील सत्तावीस क्रमांकाच्या दिंंडीपर्यंत धावत जाऊन अश्वाने संत तुकारामांच्या पालखीला एक प्रदक्षिणा घालून पादुकांचे दर्शन घेतले़ अश्वाची धाव पूर्ण होताच वारकऱ्यांनी फुगड्या व मनोऱ्याचे खेळ खेळत आनंद साजरा केला़