शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंगची अश्लील गाणी ब्लॉक

By admin | Updated: December 19, 2014 00:46 IST

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी जी. आर. पाटील यांनी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगच्या अश्लील गाण्यांच्या संगणकीय लिंक ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र

हायकोर्टात माहिती : जेएमएफसी न्यायालयाचा आदेशनागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी जी. आर. पाटील यांनी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगच्या अश्लील गाण्यांच्या संगणकीय लिंक ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.पाचपावली पोलिसांनी नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सायबर लॉ शाखेला जेएमएफसी न्यायालयाच्या आदेशाची प्रत पाठविली आहे. तसेच, सोबतच्या पत्रात हनीसिंगच्या अश्लील गाण्यांच्या पाच संगणकीय लिंक नमूद करून त्या ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. २४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक हनीसिंगला शोधण्यासाठी मुंबईला गेले होते. पथकाने बांद्रा पोलीस, हनीसिंगचे विधी सल्लागार अ‍ॅड. रिजवान सिद्धिकी व हनीसिंगचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतरही त्यांना हनीसिंगचा पत्ता मिळाला नाही. ही बाब लक्षात घेता न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणावर उद्या, शुक्रवारी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. यापूर्वी पोलीस पथक दिल्लीत जाऊन रिकाम्या हाताने परत आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)काय आहे प्रकरणअश्लील गाणी गाणे, अश्लील गाण्यांच्या चित्रफिती व ध्वनीफिती काढणे या आरोपांखाली हनीसिंग व संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी आनंदपालसिंग जब्बल यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यावरून गेल्या २६ एप्रिल रोजी पाचपावली पोलिसांनी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.