शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

होमी भाभांचा बंगला लिलावात

By admin | Updated: June 19, 2014 02:59 IST

भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मलबार हिल येथील ‘मेहरांगीर’ हा बंगला बुधवारी तब्बल ३७२ कोटी रुपयांना विकला गेला.

मुंबई : भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मलबार हिल येथील ‘मेहरांगीर’ हा बंगला बुधवारी तब्बल ३७२ कोटी रुपयांना विकला गेला. एनसीपीएच्या वतीने (नॅशनल सेंटर परफॉर्मिंग आर्ट्स) घेतलेल्या लिलावादरम्यान विक्रमी बोली लावून हा बंगला विकत घेणाऱ्याने ओळख जाहीर करू नये, अशी विनंती केल्याने संबंधिताचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डनलगत १५ हजार चौरस फूट आणि १ हजार ५९३ चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन मजली ‘मेहरांगीर’ बंगला आहे. १९६६ साली डॉ. भाभा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर ‘मेहरांगीर’चा ताबा कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असणारे त्यांचे बंधू जमशेद यांच्याकडे आला होता. मात्र २००७ साली जमशेद यांचाही मृत्यू झाल्यानंतर हा बंगला एनसीपीएकडे हस्तांतरित झाला.२०१० सालीच हा बंगला लिलावात काढण्यासाठीचे प्रयत्न झाले होते. मात्र हे प्रकरण थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात पोहोचल्याने ते तेथेच थंडावले. मात्र पुन्हा या बंगल्याच्या लिलावाची चर्चा सुरू झाली. परंतु या बंगल्याच्या लिलावाला स्थगिती देण्यासाठी भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या कर्मचारीवर्गाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने बंगल्याच्या लिलावाच्या स्थगितीच्या मागणीस नकार दर्शविला. शिवाय याबाबतची सुनावणी २३ जून रोजी ढकलत अगदी गरजेचे झाले तर लिलाव रद्द करण्यात येईल, असे म्हटले. त्यानंतर एनसीपीएने बुधवारी हा बंगला लिलावात काढला. (प्रतिनिधी)