शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘घरवापसी’ने शत्रूंच्या संख्येत घट

By admin | Updated: March 2, 2015 01:40 IST

एका व्यक्तीच्या घरवापसीमुळे शत्रूंची संख्या एकाने कमी होते आणि एका हिंदू व्यक्तीच्या धर्मांतरामुळे शत्रंूच्या लोकसंख्येत एकाने वाढ होते

बेळगाव : एका व्यक्तीच्या घरवापसीमुळे शत्रूंची संख्या एकाने कमी होते आणि एका हिंदू व्यक्तीच्या धर्मांतरामुळे शत्रंूच्या लोकसंख्येत एकाने वाढ होते, असे खळबळजनक वक्तव्य गोरक्ष पीठाचे महंत, खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे केले. विश्व हिंदू परिषदेच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची वेळ आली आहे. अखंड हिंदू राष्ट्राचा उद्देश पूर्ण झाला नाही. त्याला कारण जातीवर आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता हेच आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भेदभाव आणि अस्पृश्यतेला तिलांजली देणे आवश्यक आहे परकीयांच्या आक्रमणामुळे मोठ्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर झाले असून, आता त्यांना गुदमरल्यासारखे होत आहे. त्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचे आहे. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. भारतातील मुस्लीम सुरक्षित आणि शांततापूर्ण जीवन जगत आहेत, त्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माची सहिष्णुता आहे, असे त्यांनी सांगितले. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतीक असल्यामुळे गोहत्या बंदी करण्याची मागणी त्यांनी केली.कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठीच कर्नाटकात हिंदूंविरोधी कृत्य करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)