शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

फाका घालत होम धगधगले...

By admin | Updated: February 25, 2015 00:14 IST

रत्नागिरी जिल्हा : २ हजार ७८४ खासगी होळ्यांचीही धूम

सुभाष कदम - चिपळूण ‘साया रे साया डोंगरी साया, आमच्या भैरीबुवाला सोन्याचा पाया रे...’ अशा विविध फाका घालत सोमवारपासून रात्री पहिली होळी पेटवण्यात आली. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘होळी रे होळी शिमग्याची पोळी...’ अशा गगनभेदी फाका घालत कोकणात फाक पंचमीपासून होळीला सुरुवात होते. गणेशोत्सवाइतकाच कोकणी माणसाला शिमगोत्सव प्रिय आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १२ हजार ९१६ पेक्षा जास्त होळ्या पेटणार आहेत, तर ९९६ ग्रामदेवतांच्या पालख्या शिमगोत्सवात घरोघरी फिरणार आहेत. आजपासून या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या होळीपासून होळीच्या खेळाला अधिकच रंगत येते. काही ठिकाणी आट्या-पाट्या, कबड्डीसारखे खेळ खेळले जातात. रात्री उशिरा होळी लावताना काही ठिकाणी पोपटी किंवा मोंगा पार्टी केली जाते. पूर्वी होळीसाठी गवत व लाकडे चोरुन आणण्यात धन्यता मानत. आता काळ बदलला. त्यामुळे काही ठिकाणी लाकडाऐवजी केवळ पालापाचोळा व गवत वापरुन होळी पेटविली जाते. ग्रामीण भागात आजही शेवरीच्या झाडाचा होळीसाठी वापर केला जातो. यावर्षी १० हजार १३२ सार्वजनिक होळ्या, तर २ हजार ७८४ खासगी होळ्या मिळून १२ हजार ९१६ होळ्या पेटणार आहेत. होळीसाठी जवळजवळ १३ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा व परंपराही राखली जावी, यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केला जात आहेत. शेवरीचे झाड हे तसे जंगली, काटेरी व निरुपयोगी गणले जाते. त्यामुळे होळीसाठी त्याचाच वापर केला जातो. काही ठिकाणी आंब्याचा किंवा माडाचा वापर केला जातो. गावानुसार प्रथा बदलते आणि परंपरेनुसार ती जोपासली जाते. आजही ग्रामीण भागात होळीला पुरणपोळीचा नेवैद्य दाखविला जातो. धुलीवंदनाच्या पहाटे होम लावला जातो. या होमाला नवदाम्पत्य नारळ अर्पण करते. काही ठिकाणी होमाला शीत (कोंबडा) बांधला जातो. होळीचे हे दहा दिवस लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत चैतन्याने भरलेले असतात. उत्साह ओतप्रोत वाहात असतो. गावची यात्रा झाली की, शिमगोत्सवाची सांगता होते. रंगपंचमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गावात शिंपण्याचा कार्यक्रम होत असतो. या उत्सवात रुढी, परंपरा, मानपान जपला जातो. मात्र, हे सारे करताना अमाप उत्साह प्रत्येकाच्या अंगी असतो. समज, समजूती कायम...सावर्डेत होल्टा होम... सावर्डे गावी होल्टा होम लावला जातो. हा होम प्रसिद्ध आहे. पौर्णिमेच्या दिवशी हा होम लावला जातो. यावेळी दोन्ही बाजूचे मानकरी एकमेकांवर जळके होल्टे (जळके लाकूड) फेकतात. परंतु, आतापर्यंत त्यात कोणी जखमी झाल्याचे ऐकिवात नाही. मांसाहार किंवा मद्यप्राशन केलेल्यांना मात्र शिक्षा मिळतेच, असे मानले जाते.आजपासून होळीच्या सणाला झाली सुरुवात. १३ हजारपेक्षा जास्त शेवरीच्या व इतर झाडांची होणार कत्तल.पारंपरिक पद्धतीने सायंकाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी आणण्यात आली.काही ठिकाणी नवदाम्पत्यांतर्फे करण्यात आली होळीची पूजा.आट्या-पाट्यांचा खेळ, दिंडे, आमट्या वाजवण्यासाठी तरुणाई सज्ज.जिल्ह्यातपेटणाऱ्या होळ्या12916सार्वजनिक होळ्या10132खासगी होळ्या2784996ग्रामदेवतांच्या घरी फिरणाऱ्या पालख्याझाडांची कत्तल13000595खेळे सज्जकाही ठिकाणी आंब्याची, तर बहुतांश ठिकाणी माडाची होळी असते.