राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - चित्रा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:42 PM2020-02-03T13:42:22+5:302020-02-03T14:05:40+5:30

तरुणीला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

hinganghat burning case is extremely serious says chitra wagh | राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - चित्रा वाघ

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे - चित्रा वाघ

googlenewsNext

मुंबई - हिंगणघाटमधील नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर एका तरुण शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू तरुणाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. माथेफिरू तरुणाने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेवर भाजपाच्याचित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

चित्रा वाघ यांनी सोमवारी (3 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तरुणीला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 'जालन्याची घटना ताजी असतानाचं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलाय ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे. राज्यात कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघताना दिसताहेत' असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

'विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून आरोपीला कडक शासन तर पीडितेला न्याय मिळवून द्यावा. महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी ही राज्यातील भगिनींना अपेक्षा आहे' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

नंदोरी चौकात सोमवारी सकाळी 7.30 वाजता ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकेश नगराळे (रा. दारोडा) फरार झाला आहे. तर विकेश नगराळेसोबत अन्य दोन युवक असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य

 

Web Title: hinganghat burning case is extremely serious says chitra wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.