आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 12:19 PM2020-02-03T12:19:05+5:302020-02-03T12:22:29+5:30

आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला.

then how can bjp agree joining of Congress, Ncp Leaders; Uddhav Thackeray Criticize bjp | आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

Next
ठळक मुद्देखासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. अनेक राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने मोठी भरतीच आयोजित केली होती. भाजपानेकाँग्रेसचा विरोधी पक्षनेताच फोडून पक्षात घेतला होता. यानंतरही अनेक राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेत्यांना पक्षात प्रवेश दिला होता. या नेत्यांवर राज्यातील भाजपा नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये बोट ठेवले. भाजपाला टीका करून दे, त्यांनाच नैतिकता नाहीय, असा आरोप त्यांनी भाजपावर केला आहे. 


सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. भाजपाने केलेल्या टीकांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. कश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का? असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. 

पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना? असा खोचक सवाल ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे. 


नैतिकतेच्या गोष्टी कोणी कोणाला शिकवायच्या! मघाशी आपण उदाहरणं पाहिली. मोदींवर टीका करणारेसुद्धा त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता? रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते? आता बिहारमध्येच त्यांची आपापसात जुंपलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका. यांच्याकडून राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, असा आरोपही ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांवर केला आहे. 

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

भाजपाकडून वाल्मिकींचा अपमान...
वाल्याचा वाल्मीकी हा खरं म्हणजे वाल्मीकी ऋषींचा अपमान आहे आणि वाल्याचासुद्धा अपमान आहे. कारण वाल्या प्रामाणिक होता. तपश्चर्या करून तो वाल्मीकी झाला. सत्तांतर करून नाही. तो या पक्षातून त्या पक्षात गेला आणि वाल्याचा वाल्मीकी नाही झाला. आता सत्ता गेल्याने पक्षांतर केलेल्या नेत्यांचे काय होणार याचीच उत्सुकता असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 

Web Title: then how can bjp agree joining of Congress, Ncp Leaders; Uddhav Thackeray Criticize bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.