...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 09:55 AM2020-02-03T09:55:14+5:302020-02-03T10:06:02+5:30

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे.

... then I would not have been Chief Minister - Uddhav Thackeray | ...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

Next

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबतही भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये जे जसं ठरलं होतं त्याप्रमाणे घडलं असतं तर मी आज मुख्यमंत्री झालो नसतो, असे त्यांनी सांगितले. 

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये सध्या  महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.'' 

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हिंदुंनाही जड जाईल-  उद्धव ठाकरे

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मी काय मागितले भाजपकडे? जे ठरले होते तेवढेच द्या. मी त्यांच्याकडे चांद-तारे मागितले होते काय? असा सवालही त्यांनी केला. ''तसेच मी अशाप्रकारे सत्तेत येईन असं मला आणि जनतेलाही कधीच वाटलं नव्हतं. तसं पाहिलं तर या खुर्चीत बसण्याची महत्त्वाकांक्षा मी कधी व्यक्त केली नव्हती. किंबहुना स्वप्नातही मी कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, पण आपण जे वागत असतो ते कोणीतरी अज्ञात शक्ती बघत असते असाच अर्थ यातून घ्यावासा वाटतो. ही एवढी मोठी जबाबदारी त्यामुळेच तर माझ्याकडे आली असावी. देशात अनेक राज्ये आहेत, पण हे जे मुख्यमंत्रीपद आहे ते इतरांपेक्षा मोठं आहे. मोलाचं आहे. कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. अशा महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मला बसवलं गेलं हे त्या शक्तीचेच आशीर्वाद आहेत, बाकी दुसरं काय!, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

र विधानसभेतून की परिषदेतून निवडणूक लढविणार या राऊतांच्या प्रश्नाला त्यांनी विधानपरिषदेचे संकेत दिले आहेत. राज्यात आता लगेचच विधानपरिषदेच्या निवडणुका येतील. विधानसभेवर जायचे म्हणजे जो निवडून आला त्याला राजीनामा द्यायला लावून पुन्हा निवडणूक घ्यावी लागले. यामुळे माझ्यावरील जबाबदारी पार पाडण्यासाठी विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. 

Web Title: ... then I would not have been Chief Minister - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.