'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 01:14 PM2020-02-02T13:14:40+5:302020-02-02T13:21:47+5:30

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टीका केली आहे.

bjp ashish shelar slam cm uddhav thackeray on mumbai | 'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Next

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टीका केली आहे. आशिष शेलार यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

शेलार यांनी मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केल्याचं म्हणत शिवसेनाला टोला लगावला आहे. 'मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी "फेंकम फाक" करणाऱ्यांनी 24×7 बार उघडे केले. गेले 3 दिवस मात्र मुंबईकर पाण्यावाचून तडफडत राहिले. भल्यामोठ्या देशाच्या अर्थसंकल्पावर यांनी बोलण्यात काय अर्थ! एवढी वर्षे मुंबईकरांसोबत अशी "ही बनवाबनवी" सुरू आहे. हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!' असं ट्वीटमध्ये शेलार यांनी म्हटलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये घेण्यात येत होती. यावरून देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात टीकाही झाली होती. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आले. यावरून आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजित केलेले होते. नेहमीप्रमाणे हे प्रशिक्षण शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी प्रशिक्षण पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आले. या प्रशिक्षणावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यामुळे हे खेदजनक असून पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखविणारे असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. 

अधिकाऱ्यांचे हे प्रशिक्षण हे कायद्याविषयीचे होते. काँग्रेसने आक्षेप घेत ते तडकाफडकी रद्द करण्यास लावले या कृत्याचे तुम्ही समर्थन करणार नाही, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडून शेलार यांनी व्यक्त केली. तसेच यापुढची प्रशिक्षणे मदरसे किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये घ्यावीत, असा टोलाही लगावला आहे. तसेच वैचारिक अस्पृश्यता असेल तर याआधी संघ विचाराचे सरकार होते. त्यामुळे विधानसभेतील बाकेही धुवून पुसून घ्यावीत, असा खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसच्या माजी खासदारांनी वैचारिक अस्पृश्यता दाखविली त्यांना वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने योग्य दखल घ्याल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ind Vs NZ 5th t20 live : भारताचे अर्धशतक पूर्ण, ६ षटकांत १ बाद ५३

यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली 

 

Web Title: bjp ashish shelar slam cm uddhav thackeray on mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.