शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात हायअ‍ॅलर्ट

By admin | Updated: July 28, 2015 03:22 IST

पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.

मुंबई : पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सूचना आल्याने हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या परिसरातील संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबतची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस यंत्रणेला कळवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनावरही दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मक्बूल खान अतिरेकी हल्ला करू शकतो. त्याला पाकिस्तानी सेना आणि आयएसआय या हल्ल्यात मदत करण्याची शक्यता आहे, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून सर्व राज्यांना देण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)पोलीस बंदोबस्त वाढविलामुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना विशेष दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया, दूतावास, सर्व प्रमुख रेल्वे स्थानके व अन्य प्रमुख ठिकाणी तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १५ आॅगस्टपर्यंत ही सतर्कता कायम असणार आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू असल्याने त्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी़ परिसरात आढळणाऱ्या संशयास्पद व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने कळवून पोलिसांना सहकार्य करावे.- संजीव दयाळ, पोलीस महासंचालक