वर्धेत सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग

By Admin | Updated: August 21, 2014 01:44 IST2014-08-21T01:44:16+5:302014-08-21T01:44:16+5:30

सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याचे मंगळवारी रात्री उघडकीस आल़े पिडीत बालिकेला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले

High School on Six-Year-Old Child | वर्धेत सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग

वर्धेत सहा वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग

वर्धा : सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याचे मंगळवारी रात्री उघडकीस आल़े पिडीत बालिकेला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिका:यांनी सांगितल़े याप्रकरणी इरफान शहा मजलिन शहा (23) याला सिंधी पोलिसांनी बुधवारी अटक केली़ सिंदी येथील पीडित बालिकेचे कुटुंबीय रात्रीला गावातीलच नातेवाईकाकडे काही कामानिमित्त गेले होते. त्यांची मुलगी घरात एकटीच होती. सुमारे अध्र्या तासाने वडिल घरी पोहचले असता मुलगी घरात नसल्याचे कळल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला़ मात्र, ती आढळून आली नाही़ काही वेळानंतर ग्रामस्थांना परिसरातच ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. (प्रतिनिधी)

 

Web Title: High School on Six-Year-Old Child