शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडा हत्याकांड तपासाचे हायकोर्टास हवे प्रतिज्ञापत्र

By admin | Updated: February 3, 2015 01:30 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या तपासाची माहिती प्रतिज्ञापत्र करून सादर करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, यासाठी केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरकारतर्फे तपासाची माहिती तोंडी देण्यात आली. मात्र त्याच्या योग्यतेविषयी अर्जदाराच्या वकिलानेशंका उपस्थित केल्यावर सरकारला प्रतिज्ञापत्रावर माहिती देण्यास सांगण्यात आले.गेल्यावर्षी झालेल्या या हत्याकांडाने महाराष्ट्र सुन्न झाला होता. विविध संघटनांनी यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन केले़ त्याचवेळी याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी प्रोफेसर अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर झेंडे व सुनील पवार यांनी याचिकेद्वारे केली होती़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात याचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, यातील आरोपीला पकडल्याचे शासनाने न्यायालयात सांगितले़ एखाद्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्याबाहेरील पोलिसांचे पथक नेमायला हवे़ या हत्याकांडाच्या तपासासाठी येथील पोलिसांचेच विशेष पथक नेमले़ त्यामुळे पारदर्शक तपास झाला असावा का, यावर प्रश्नचिन्हच आहे़ तसेच यातील आरोपी पकडणाऱ्या पोलिसांची नार्को टेस्ट झाली पाहिजे़ कारण याद्वारे या पोलिसांनी खरे आरोपी पकडले की नाही हे सिद्ध होईल, असा युक्तिवाद अ‍ॅड़ गुणरत्न यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)