लपवली संपत्ती, खाली चिक्की, अब की बार आपकी हार पक्की - विरोधकांची घोषणा

By Admin | Updated: July 24, 2015 20:08 IST2015-07-24T20:05:41+5:302015-07-24T20:08:14+5:30

लपवली संपत्ती, खाल्ली चिक्की, अब की बार आपकी हार पक्की अशा घोषणा देत विरोधकांनी भाजपा सरकारला चिमटा काढला.

Hidden treasures, chikki below, nowadays your necklace is confirmed - the announcement of the opponents | लपवली संपत्ती, खाली चिक्की, अब की बार आपकी हार पक्की - विरोधकांची घोषणा

लपवली संपत्ती, खाली चिक्की, अब की बार आपकी हार पक्की - विरोधकांची घोषणा

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २४ -  पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून लपवली संपत्ती, खाल्ली चिक्की, अब की बार आपकी हार पक्की अशा घोषणा देत विरोधकांनी भाजपा सरकारला  चिमटा काढला. पंकजा मुंडेवर निशाणा साधण्यासाठी विरोधकांनी चिक्कीचा पुडा आणला असून या चिक्कीवर किंमत ६० कोटी रुपये असे लिहीले आहे.
राज्यातील विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून  पंकजा मुंडे यांच्या खात्यातील चिक्की प्रकरण व विनोद तावडेंच्या बोगस डिग्री प्रकरणामुळे हे अधिवेशन गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे. शुक्रवारी विरोधक पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन आक्रमक झाले असून शुक्रवारी विधीमंडळांच्या पाय-यावर बसून विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. चिक्की मंत्री हाय हाय, बोगस डिग्री हाय हाय अशी घोषणा देत विरोधकांनी सत्ताधा-यांवर टीका केली.
 

Web Title: Hidden treasures, chikki below, nowadays your necklace is confirmed - the announcement of the opponents