Heavy rains in many places in Central Maharashtra including Konkan, Mumbai | कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, विदर्भात जोरदार पाऊस

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे २४ तासात तब्बल ७१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात कोकण गोव्यात वैभववाडी ७१०, मुंबई (कुलाबा) ३३०, उरण ३२०, रोहा ३००, भिरा २९०, पालघर २६०, माथेरान, श्रीवर्धन २४०, मंडणगड २३०, माणगाव, पनवेल, पेण २२०, मुरुड, सुधागड पाली २१०, म्हसाळा २००, महाड, पोलादपूर, ठाणे १८०, अलिबाग, दापोली १७०, पेडणे १५०, हर्णे १४०, बेलापूर, दोडामार्ग, कल्याण, वाडा १३०, चिपळूण, उल्हासनगर १२०, भिवंडी, कर्जत, खेड ११०, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
मध्य महाराष्ट्रात राधानगरी २३०, गगनबावडा २१०, महाबळेश्वर १९०, आजरा १८०, चांदगड १७०, लोणावळा १६०, वेल्हे १३०, कागल, पन्हाळा १२०, कोल्हापूर ११०, गडहिंग्लज, शाहूवाडी ९०, दिंडोरी ८०, भोर, पौड मुळशी, शिरपूर ७०, निफाड, पाटण ६० मिमी पाऊस पडला.
याचवेळी घाटमाथ्यावरील ताम्हिणी ३३०, कोयना (नवजा) ३००, शिरगाव, डुंगरवाडी २८०, दावडी, अम्बोणे २७०, कोयना (पोफळी) १९०, लोणावळा (टाटा) १७०, खोपोली १४०, वळवण ११० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
विदर्भात गोरेगाव १५०, आमगाव १२०, पारशिवनी ७०, गोंदिया, रामटेक, सौनेर, ६०, नागपूर, उमरेड ५० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यात अंबड ३०, गंगाखेड, घनसावंगी, जाफराबाद, सेलू, उमरगा येथे २० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

कोकणात आणखी ५ दिवस पाऊस
याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील पावसाचे प्रमाण आता कमी झाले असले तरी कोकणात पुढील ५ दिवस पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. 

राज्यात कोकण वगळता इतरत्र ९ ऑगस्टपर्यंत पाऊस कमी राहील.त्यानंतर १०, ११ व १२ आॅगस्ट दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
७ व ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
़़़़़़़़़़़

महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १३० मिमी पाऊस
गुुरुवारी दिवसभरात मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला असून महाबळेश्वरमध्ये सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यात तब्बल १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (कुलाबा) ११, सांताक्रुझ २५, अलिबाग १४, जळगाव ११, पुणे ७, नाशिक ९ सातारा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
़़़़़़़़़़
हवामान विभागाच्या अंदाजानुसार;  २४ तासात २०४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते. वैभववाडी येथे अतिवृष्टीपेक्षा तिप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे. यापूर्वी चिन्नईमध्ये १ व २ डिसेंबर २०१५ मध्ये असाच विक्रमी पाऊस झाला होता़ त्यात जवळपास संपूर्ण चिन्नई शहर पाण्याखाली गेले होते़ मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडतो. चेरापुंजी येथे १५ व १६ जून १९९५ मध्ये ४८ तासात तब्बल २ हजार ४९३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Heavy rains in many places in Central Maharashtra including Konkan, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.