शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मुंबई, रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:03 PM

येत्या २४ तासात मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़...

ठळक मुद्देमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पाऊस हा पाऊस २१ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार

पुणे : आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकले असून यामुळे सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे़. येत्या २४ तासात मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या दिशेने आले आहे़. सध्या मॉन्सून कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटकचा अंतर्गत भाग, उत्तर प्रदेश्, मध्य प्रदेशात सक्रीय आहे़. हा पाऊस २१ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे़ गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़. विदर्भात सर्वदूर पाऊस पडला आहे़. मराठवाड्यात अनेक दिवसांनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे़. त्यात किनवट, निलंगा ६०, आष्टी ५०, अहमदपूर, अंबड, घनसावंगी, लातूर ४०, औरंगाबाद, धमार्बाद, कन्नड, लोहा, माहूर, परभणी ३०, अधार्पूर, औसा, गेवराई, हदगाव, हिमायतनगर, परतूर, वैजापूर २० मिमी पावसाची नोंद झाली होती़. विदर्भातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला़. बुधवारी दिवसभरात मुंबई, विजयवाडा, जबलपूर येथे जोरदार पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला़. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे़ गेल्या २४ तासात पडलेला पाऊस खालापूर १६०, पनवेल ११०, माथेरान, सावनेर ८०, सुधागड पाली, बल्लारपूर ७०, भिवंडी, कळमेश्वर, कर्जत, ठाणे ६०, डहाणु, कल्याण, उल्हासनगर, वाडा, नागपूर ५० मिमी पावसाची नोंद झाली होती़. बुधवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापूर ५८, सातांक्रुझ ३८, लोहगाव पुणे १३, कोल्हापूर ६, भिरा ५, औरंगाबाद, चंद्रपूर ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.

* इशारा : १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल़. २० सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. २१ सप्टेबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़. 

..........

मुंबई, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १९ सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता, तसेच २० व २१ सप्टेंबरला मुसळधार पाऊस, रत्नागिरी व पालघर  जिल्ह्यात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता़ आहे़.पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १९ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यात २० सप्टेंबरला जोरदार पाऊस होईल़. औरंगाबाद, बीड जिल्ह्यात १९ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ आहे़.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईRainपाऊसFarmerशेतकरीfloodपूरGovernmentसरकारweatherहवामान