शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दररोज २९ बांधकामांवर ‘हातोडा’

By admin | Updated: June 8, 2017 02:23 IST

एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ४१३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ४१३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या कालावधी अंतर्गत १३ महिन्यांचे साधारणपणे ३९५ दिवस होतात. ही बाब लक्षात घेतल्यास दररोज २९ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा, शीव, चुनाभट्टी, वडाळा, अ‍ॅन्टॉप हिल या परिसरांचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ विभागात सर्वाधिक १ हजार ८४० बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याखालोखाल चेंबूर, टिळकनगर आदी परिसरांचा समावेश असलेल्या ‘एम/पश्चिम’ विभागात १ हजार १९० बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तर यानंतर ‘आर/उत्तर’ विभागात १ हजार ९५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ‘आर/उत्तर’ विभागात प्रामुख्याने दहिसर परिसराचा समावेश होतो. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ हजार ६१९ निवासी स्वरूपाच्या, २ हजार ५०६ व्यावसायिक स्वरूपाच्या; तर ५ हजार २८८ झोपड्यांच्या/कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांवरील कारवाईचा समावेश होता.>दर महिन्याला आढावा बैठकीचे आयोजनअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्यात आली आहे.या अंतर्गत प्रामुख्याने महापालिकेची ७ परिमंडळे व त्या अंतर्गत येणारे २४ प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावर दर महिन्याला आढावा बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे.संबंधित परिमंडळीय उपायुक्त व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणाऱ्या या बैठकांदरम्यान अगोदरच्या महिन्यात करण्यात आलेल्या कारवायांचा सविस्तर आढावा घेतला जातो.पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांचे सुव्यवस्थित नियोजनदेखील करण्यात येते. या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती प्राप्त झाली आहे.अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांनाही आळा बसण्याच्या दृष्टीने संबंधित बाबींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.