शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांची ‘लोकमत’ला शुभेच्छाभेट

By admin | Updated: December 17, 2014 00:34 IST

लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांनी मंगळवारी लोकमत भवनाला शुभेच्छा भेट दिली. यात पर्यावरण मंत्री रामदास कदम,

नागपूर : लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांनी मंगळवारी लोकमत भवनाला शुभेच्छा भेट दिली. यात पर्यावरण मंत्री रामदास कदम, अन्न व नागरी पुरवठा-संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश होता. या सर्व मंत्र्यांनी यावेळी ‘लोकमत’च्या वाटचालीविषयी प्रशंसोद्गार काढले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चिफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. जनतेचा विकास डोळ््यासमोर ठेवून काम करण्याचा मानस सर्वांनीच व्यक्त केला. राज्याच्या पर्यावरण विभागाकडे काम करायला खूप संधी आहे. पर्यावरणाला हानी न होता राज्याचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. कोकण ते मुंबई हा समुद्री महामार्ग निर्माण करण्याचा मानस आहे. विविध प्रकल्पांचा अभ्यास सुरू असून मी तेथे जाऊन आढावा घेणार आहे.-रामदास कदमपर्यावरणमंत्रीसार्वजनिक वितरण प्रणालीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार मोडीत काढण्याचे मोठे आव्हान राज्य शासनासमोर असून ‘बायोमॅट्रिक कार्ड’द्वारे यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असेल. भेसळ अजिबात सहन करण्यात येणार नाही व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करु.-गिरीश बापटअन्न व नागरी पुरवठामंत्रीसिंचन घोटाळ््यात ज्या व्यक्ती दोषी आढळतील त्यांच्यावर पक्ष वगैरेची मुलाहिजा न बाळगता कारवाई होणारच. जे सिंचन प्रकल्प जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचत आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. विभागाच्या कामात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न राहील. -गिरीश महाजनजलसंपदामंत्रीराज्य परिवहन मंंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी ‘बोगस’ कागदपत्रांचा आधार घेण्यात येतो. तहसीलदारांचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यांनाच सवलत देण्याची भूमिका असेल. ‘शिवनेरी’ बस ‘सीएनजी’वर चालविण्याचा विचार आहे.-दिवाकर रावतेपरिवहनमंत्री