शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरानंदवन’च्या माध्यमातून फुलणार आनंदवनात ‘हिंमतग्राम’!

By admin | Updated: December 24, 2014 00:02 IST

आदिवासींमधील कलागुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याच्या हेतुतून साकारले स्वरानंद, डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन.

राम देशपांडे/ अकोला :स्वरानंदवनच्या माध्यमातून आनंदवनातील आदिवासींच्या जीवनात आनंद भरणारे हिंमतग्राम उभारण्यात येणार असल्याची माहिती स्वरानंदवनचे जनक डॉ. विकास आमटे यांनी दिली. आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांचा स्वरानंदवन हा सूरमय संगीत कार्यक्रम नुकताच अकोल्यात झाला. याप्रसंगी डॉ. आमटे यांनी लोकमतशी बोलताना स्वरानंदवन मागील भूमिका विषद केली. आनंदवनातील दीड हजार कलाकारांना सोबत घेणे कसे शक्य झाले?डॉ. आमटे : अर्थातच यामागची सर्व प्रेरणा मला बाबांकडूनच मिळाली. लगतच्या गावांनी, जवळच्या नातेवाईकांनी नाकारलेल्या आणि हातापायांची बोटे गळालेल्या आदिवासी बांधवांना बाबांनी जवळ केलं. बाबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. आनंदवनात आज तिसरी पिढी राहत आहे. १९७0 मध्ये बाबा सोमनाथला गेल्यानंतर खरी जबाबदारी मी स्वीकारली. या लोकांमध्ये अगणित कला आहेत. त्यांच्या या कला गुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, या संकल्पनेतूनच ह्यस्वरानंदवनह्णची निर्मिती झाली.काय आहे स्वरानंदवन?डॉ. आमटे : आनंदवनातील अंध, अपंग, आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या कलागुणांचा आविष्कार म्हणजे स्वरानंदवन. प्रत्येकात कोणती ना कोणती कला दडलेली असते. ती कला सादर करण्यासाठी त्याला केवळ प्रोत्साहनाची गरज असते. मी तेच केलं. विविध कारणांमुळे नैराश्य आलेल्या या बांधवांमधील सुप्त गुणांचा संचार म्हणजेच स्वरानंदवन.हिंमतग्राम ही काय संकल्पना आहे?डॉ. आमटे : बाबांनी दिलेला वारसा आम्ही पुढे चालवित आहोत. या बांधवांना स्वत:च्या मेहनतीवर स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे, यासाठी खरा अट्टाहास आहे. येथे राहणार्‍या सर्व आदिवासी बांधव आपापल्या परीने श्रमदान करून साहित्य निर्मिती करतात. त्यांची विक्री करून त्यापासून येणारा पैसा त्यांच्या उपयोगी आणला जातो. या बांधवांना आपल्या हक्काचं घर मिळावं. यासाठी त्यांनी सादर केलेल्या कलेतून जी आर्थिक प्राप्ती होईल, त्यातून त्यांच्यासाठी हिंमतग्राम वसविले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत राज्यात स्वरानंदवनचे जवळपास ८५0 प्रयोग झाले. लवकरच आनंदवनात हिंमतग्राम फुलणार, यात शंका नाही.आजच्या तरुण पिढीला काय सांगाल?डॉ. आमटे : असे नाही की सर्वच तरुण स्वत:मध्ये व्यस्त आणि मग्न आहेत. आनंदवनात सेवा कार्य करणार्‍या राज्यातील विविध भागातील तरुण मंडळींचा आज मोठा सहभाग आहे. केवळ तरुणांनाच नव्हे, तर इतर सर्वांना मी या माध्यमातून आनंदवनाला भेट देण्याचं निमंत्रण देतो. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, तुमच्या जीवनाला नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल.