शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अडतमुक्त बाजाराची शत्तकोत्तर परंपरा

By admin | Updated: December 24, 2014 00:21 IST

जळगाव जामोद कृउबासच्या पावलावर महाराष्ट्राचे पाऊल !

जयदेव वानखडे/जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या अडतमुक्त करण्याचे धोरण सध्या चांगलेच गाजत आहे. अडतमुक्त धोरण ११0 वर्षापासून बुलडाणा जिलतील जळगाव जामोद येथे राबविले जात आहे. शेतकर्‍यांचे हित जोपासणारी ही राज्यातील एकमेव अडतमुक्त बाजार समिती आहे. याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील बाजार समित्या अडतमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता, परंतु त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची सहज विक्री व्हावी त्याला योग्य भाव मिळावा या उद्देशाने उदय झालेल्या बाजार समितीच्या उद्देशाला जळगाव जामोद येथे खर्‍या अर्थाने मूर्तरूप दिले आहे. सध्या या बाजार समिती अंतर्गत येणार्‍या आसलगाव, जळगाव जामोद, पिंपळगाव या सर्व केंद्रावर शेतमालाची अडतमुक्त खरेदी-विक्री होत आहे. जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांचा आलेला माल आलेल्या क्रमांकानुसार लावला जातो. मार्केटची माणसे हाराशी पावती बनवतात व एक कर्मचारी धान्य हातात घेवून बोलीस सुरूवात करतो व जो व्यापारी जास्त भाव देईल, त्या नावे हाराशी पावती बनवून देतो. त्या तीन प्रतीत असतात. त्यापैकी एक प्रत शेतकरी, एक व्यापारी तर एक बाजार समितीकडे राहते. त्यानंतर सदर व्यापार्‍याच्या काट्यावर माल नेवून शेतकरी ठरलेल्या भावानुसार आपला माल मोजून देतात व पैसे आणि रिकामा बारदाना घेवून अडत न कापल्याने समाधानाने परततात. शेतकरी हिताचे लक्ष ठेवून त्यांना विना अडत चोख मोजमाप, नगदी चुकारा आणि खुल्या पद्धतीने हाराशी पद्धतीचा अवलंब केला. येथे शेतकरी माल विकला त्याच पैसा घेवून मोकळा होतो. त्यामुळे त्याला इतर बाजार समित्यांमध्ये माल नेणार्‍या शेतकर्‍यासारखे नुकसान सोसावे लागत नसल्याचे जळगाव जामोदची कृउबास माजी सभापतीचे प्रसेनजित पाटील यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. *खुल्या लिलाव पद्धतीने धान्याची हाराशी, चोख मोजमाप आणि तेही पोत्यांमध्येच. नगदी चुकारा आणि तोही विना अडत तसेच याठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतमालाला चाळणी लावली जात नाही. ही या बाजार समितीची वैशिष्ट्ये आहे. वर्षाकाठी ७ ते ८ लाख क्विंटल धान्याची खरेदी विक्री या समितीच्या सर्व यार्डामधून होत असल्याने ३ ते ४ कोटी रूपयांची अडत वाचते पर्यायाने हा शेतकर्‍यांचाच फायदा होतो.