शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

काशिमीरातून १४ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: March 11, 2015 02:09 IST

गुजरातहून मुंबईत गुटखा घेऊन जाणारा टेम्पो उपअधिक्षक सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पकडला.

भार्इंदर : गुजरातहून मुंबईत गुटखा घेऊन जाणारा टेम्पो उपअधिक्षक सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास पकडला. त्यातून सुमारे १४ लाख ४० हजारांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे़राज्यात बंदी असलेला गुटखा मुंबईच्या दिशेने येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घोडबंदर मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेल परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी तेथून शहरात जाणाऱ्या मार्गाजवळ ४०७ टेम्पो क्र. एमएच ०४ एफपी ८२५ संशयास्पदरित्या उभा असलेल्याचे पथकाला आढळले. त्यांनी त्याची झाडाझडती घेतली असता, त्यात विमल गुटखा व ए-वन तंबाखूच्या प्रत्येकी ४० गोणी आढळल्या. पथकाने हा मुद्देमाल काशिमिरा पोलिसांच्या ताब्यात देऊन टेम्पोसह गुटखा, तंबाखू जप्त केला. तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. मुद्देमालाची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरिक्षक माणिक जाधव यांना पाचारण केले असता त्यातील विमल गुटख्याची बाजारातील किंमत १२ लाख तर व ए-वन तंबाखूची किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधीक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)