शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

माळीण गावावर दु:खाचा डोंगर

By admin | Updated: July 31, 2014 11:06 IST

आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेल्या माळीण गावावर बुधवारी सकाळी अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला.

घोडेगाव (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये वसलेल्या माळीण गावावर बुधवारी सकाळी अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत माळीण गाव नकाशावरून नष्ट झाले आहे. सुमारे ७०४ लोकवस्तीच्या या गावातील सुमारे २०० जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सायंकाळपर्यंत २० मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे ३०० जवान बचावकार्यात गुंतले आहेत.आजची सकाळ माळीण गावावर अस्मानी संकट घेऊनच उगवली. आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांची रोजची कामे सुरू असताना अचानक बाजूच्या डोंगराचा संपूर्ण कडाच खाली कोसळला. प्रचंड आवाज आणि चिखलाचा प्रचंड मोठा लोंढा गावाच्या दिशेने वेगाने आला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही. संपूर्ण गावच चिखलाखाली गाडले गेले. या गावातील सुमारे २५ ते ३० फूट उंचीच्या मारुती मंदिराचा केवळ कळसच दिसत होता. चिखलाच्या लोंढ्याबरोबर काही जण वाहत गेले. त्यापैकी चार महिला ओढ्यापर्यंत वाहत गेल्या. त्या सुदैवाने बचावल्या. एका घराच्या भिंतीला अडकून दोन महिला वाचल्या. या सहाही जखमी महिलांना अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही दुर्घटना कळल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र संपूर्ण गावच चिखलाखाली गाडले गेलेले असल्याने मदतकार्य कसे सुरू करायचे, हा प्रश्न होता. त्यामुळे तातडीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. घोडेगाव येथून दोन जेसीबी आणि पोकलेन मागविण्यात आले. आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या सर्व भागातून स्वयंस्फूर्तीने रुग्णवाहिका आणि जेसीबीही रवाना झाले. मात्र रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडी झाली होती.