शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय

By admin | Updated: May 16, 2015 00:12 IST

स्वच्छतेचा ध्यासापोटी ग्रामीण भागातील मुलीची प्रेरणादायी वाटचाल.

राजेश्‍वर वैराळे/ बोरगाव वैराळे : घरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. हीच जागरुकता दाखवत अकोला जिल्ह्यात एका नववधुने रुखवतात तयार शौचालय मिळविले. तिच्या या आग्रही भूमिकेमुळेच विवाहसोहळ्य़ातच तिचा सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या मोझर येथील कृष्णकुमार माकोडे याच्याशी चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिचा विवाह ठरला; मात्र सासरी शौचालय नसल्याचे तिला समजले. माहेरी शौचालय असल्याने तिने सासरीही शौचालय असावे, असा निर्धारच केला. तिने कुटुंबीय आणि नातेवाइकांकडे रुखवतात तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, यासाठी आग्रह धरला. तिच्या या आग्रहाचे कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी कौतुक करीत तिला तयार शौचालय देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे पार पडलेल्या तिच्या विवाह सोहळ्यात तिचे मामा गजानन नाडे यांनी तिला रेडिमेड शौचालय रुखवतात दिले.

*कौतुकाचा वर्षाव..

      रुखवतात रेडिमेड शौचालय मिळवून स्वच्छतेचा ह्यआयकॉनह्ण ठरलेल्या चंदाचा शुक्रवारी लग्नात गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.