गर्भाशयात द्राक्षासारख्या गाठी ! मोलर प्रेग्नन्सी काय असते? ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:17 IST2026-03-31T20:16:54+5:302026-03-31T20:17:50+5:30

Nagpur : गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची बातमी असते, मात्र काही वेळा हीच गर्भधारणा एका दुर्मीळ आजाराचे रूप घेऊ शकते. नागपुरात नुकतेच दोन तरुण महिलांमध्ये 'इन्व्हेसिव्ह मोल' या अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान झाले.

Grape-like lumps in the uterus! What is molar pregnancy? Be careful if you see these symptoms | गर्भाशयात द्राक्षासारख्या गाठी ! मोलर प्रेग्नन्सी काय असते? ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Grape-like lumps in the uterus! What is molar pregnancy? Be careful if you see these symptoms

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची बातमी असते, मात्र काही वेळा हीच गर्भधारणा एका दुर्मीळ आजाराचे रूप घेऊ शकते. नागपुरात नुकतेच दोन तरुण महिलांमध्ये 'इन्व्हेसिव्ह मोल' या अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून या महिलांचे प्राण वाचवले आहेत. सामान्य गर्भधारणेऐवजी गर्भाशयात द्राक्षासारख्या गाठी वाढणे, यालाच वैद्यकीय भाषेत 'मोलर प्रेग्नन्सी' असे म्हटले जाते.

मोलर प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयात सामान्य भ्रूण विकसित होण्याऐवजी द्राक्षासारखी असामान्य ऊतकांची वाढ होते. हे एक प्रकारचे 'ट्यूमर' असतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ही वाढ गर्भाशयाच्या भिंतीत शिरून शिरून 'इन्व्हेसिव्ह मोल' तयार करते, जे अत्यंत धोकादायक असते. जर यावर पूर्ण उपचार झाले नाही, तर याचे रूपांतर नाहीत किंवा नियमित फॉलो-अप घेतला (द्राक्षगर्भाचा 'कोरिओकार्सिनोमा' कर्करोग) मध्ये होऊ शकते.

हा आजार शरीराच्या इतर भागांत, विशेषतः फुप्फुसांपर्यंत पसरण्याची शक्यता असते. हिंगणा रोड येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या आजाराच्या दोन महिलांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने 'सक्शन इव्हॅक्युएशन' आणि विशेष 'केमोथेरपी'द्वारे यशस्वी उपचार करून या महिलांना नवे आयुष्य दिले.

ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे, गर्भाशयाचा आकार अपेक्षेपेक्षा जास्त वाढणे, अतिप्रमाणात मळमळणे किंवा उलट्या होणे ही लक्षणे दिसल्यास सावध होणे गरजेचे आहे.

या डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. विलास ठोंबरे आणि उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या उपचारात डॉ. भालेराव यांच्यासह डॉ. सविता सोमलवार, डॉ. रोहिणी भोयर, डॉ. प्राजक्ता जुनेवार, डॉ. नीतू मेश्राम वाल्दे, डॉ. अश्विनी चंदनखेडे, ऑन्कोफिजिशियन डॉ. आशिष वैद्य तसेच रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. काजल मित्रा यांच्यासह डॉ. सुरेश फाटक, डॉ. ओंकार, डॉ. मयंक रंगारी, डॉ. संदीप धोटे व डॉ. प्रणित पंतवणे यांच्या प्रयत्नांना यश आले.

गुंतागुंत आणि जीवघेणा रक्तस्राव

प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. अनुजा भालेराव यांनी सांगितले, इन्व्हेसिव्ह मोलमुळे गर्भाशयाच्या स्नायूंच्या थरात पेशी खोलवर रुततात. यामुळे काही वेळा गर्भाशयाला छिद्र पडू शकते. अशा स्थितीत पोटात अंतर्गत मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन महिलेचा जीव जाण्याचा धोका निर्माण होतो.

भविष्यात मातृत्व शक्य

हा आजार गंभीर असला तरी, वेळेत निदान झाल्यास रुग्ण १०० टक्के बरा होतो. विशेष म्हणजे, योग्य उपचार आणि तज्ज्ञाच्या सल्ल्याने या महिला भविष्यात पुन्हा गर्भधारणा करू शकतात आणि एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात.
 

Web Title : मोलर प्रेगनेंसी: गर्भाशय में अंगूर जैसे विकास, लक्षण और सावधानियां।

Web Summary : मोलर प्रेगनेंसी में सामान्य भ्रूण के बजाय गर्भाशय में असामान्य ऊतक बढ़ते हैं। शुरुआती लक्षणों में भारी रक्तस्राव और पेट में तेज दर्द शामिल हैं। जटिलताओं को रोकने और भविष्य की प्रजनन क्षमता को बनाए रखने के लिए कीमोथेरेपी सहित शीघ्र निदान और उपचार महत्वपूर्ण है। नागपुर में डॉक्टरों ने ऐसे दो मामलों का सफलतापूर्वक इलाज किया।

Web Title : Molar Pregnancy: Grape-like growths in the uterus, Symptoms and Precautions.

Web Summary : Molar pregnancy involves abnormal tissue growth in the uterus instead of a normal embryo. Early symptoms include heavy bleeding and severe abdominal pain. Prompt diagnosis and treatment, including chemotherapy, are crucial to prevent complications and preserve future fertility. Doctors in Nagpur successfully treated two such cases.