शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: May 31, 2015 01:52 IST

मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी,

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळात होरपळत असून, या भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे़ आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी, खरिपाच्या पेरणीसाठी तसेच व्याजातही सवलत द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी केली़ अन्यथा शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला़ शरद पवार हे तीन दिवस मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असून, शनिवारी औरंगाबाद जिल्ह्णातील चित्ते पिंपळगाव येथून या दौऱ्याची सुरुवात झाली़ त्यांनी जालना जिल्ह्णाच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी व अंबड तालुक्यातील जामखेड या दुष्काळी गावांचा दौरा केला़ पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या़ पवार म्हणाले, टंचाई परिस्थिती आवाक्यात असेल, तर शेतकरी स्वत:च काहीतरी मार्ग काढत असतो. मात्र, यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी़ मागील सरकारच्या काळात आपण केंद्रात कृषिमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटकाळात तातडीने मदत केली. आताचे सरकार शहरी भागाचे आहे. मला सरकारमधील एक माणूस भेटला. तो म्हणतो की, आम्हाला शहरातील मतदारांनी निवडून दिले आहे. शहरी भागात महागाई वाढू नये, असे प्रयत्न असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या सरकारविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.नवा गडी पाहामागच्या दुष्काळाच्या वेळी आम्ही शेतकऱ्यांना खूप मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली किंमत दिली. तरीही नंतर तुम्ही ‘नवा गडी’ निवडला. आता नवा गडी कशी मदत करतो त्याची वाट पाहा. आता तुम्ही त्याची वाट पाहता की तो तुमची वाट पाहतोय ते मला नाही माहीत, असे सांगत पवार यांनी सरकारला मिश्कील चिमटा घेतला.