शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ हवेतच!

By admin | Updated: October 2, 2015 00:40 IST

महात्मा गांधींच्या कार्याचा वसा जोपासण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वी ‘गांधी फॉर टुमारो’ची घोषणा केली; पण अद्याप त्याचा आराखडा तयार झालेला नाही.

प्रशांत हेलोंडे, वर्धामहात्मा गांधींच्या कार्याचा वसा जोपासण्यासाठी शासनाने तीन वर्षांपूर्वी ‘गांधी फॉर टुमारो’ची घोषणा केली; पण अद्याप त्याचा आराखडा तयार झालेला नाही. शासनाच्या या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चे काम सूतभरही झाले नसून, बैठकांचे सत्र मात्र जोरात सुरू आहे. सचिवांचे निर्णय याला अडसर ठरत असल्याचे सांगितले जाते.आधी ‘गांधी फॉर टुमारो’ आणि नंतर सेवाग्राम विकास आराखडा या नावाने ड्रीम प्रोजेक्ट म्हणून स्वीकारलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाठी समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाले. या संदर्भात २० एप्रिल व २८ मे २०१३ रोजी परिपत्रक निघाले. यानंतर ९ डिसेंबर २०१३ रोजी परिपत्रक काढून ३० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. किमान यानंतर तरी प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती; पण २०१४ या संपूर्ण वर्षात सेवाग्राम विकास आराखड्याबाबत साधी चर्चाही झाली नाही.तत्कालीन आघाडी सरकारची या महत्त्वाकांक्षी योजनेला अद्याप मूर्त रूप आलेले नाही. राज्यात भाजपाची सत्ता आली. ३० मे व १५ सप्टेंबर २०१५ रोजी समितीच्या पुनर्रचनेसाठी शासन परिपत्रक काढले गेले. समितीची स्थापना, पुनर्रचना या परिपत्रकांतच सध्या सेवाग्राम विकास आराखडा अडकला आहे. पूर्वीचे प्रारूप पूर्णत: बदलले जाणार असून नवीन प्रारूप अद्याप तयार झालेले नाही. यामुळे सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये नेमके काय करणार, हे अधिकाऱ्यांनाही सांगता आले नाही.सेवाग्राम विकास आराखड्याबाबत ८ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध मान्यवरांची मते नोंदवून घेतली जाणार असून, त्यानंतर प्रारूप आराखडा तयार होईल. - प्रकाश डायरे, जिल्हा नियोजन अधिकारी, वर्धागांधी फॉर टुमारो या प्रकल्पाचे कुठलेही काम झालेले नाही. या प्रकल्पाला आश्रमची आठ एकर जमीन देण्यात आली. प्रकल्प समितीमध्ये आश्रम प्रतिष्ठानला स्थान देण्यात आले नाही. यामुळे या प्रकल्पाशी आश्रमाचा संबंध नसल्याचेच जाणवते.- जयवंत मठकर, अध्यक्ष, महात्मा गांधी आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम