शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहन खरेदीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार अग्रीम

By admin | Updated: August 21, 2014 22:18 IST

नवीन मोटार सायकल, स्कूटर, मोपेड खरेदीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना अग्रीम देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑगस्ट रोजी घेतला आहे.

खामगाव : नवीन मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचार्‍यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना अग्रीम देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑगस्ट रोजी घेतला आहे. राज्य शासनातील कर्मचार्‍यांना वाहन खरेदी करण्यासाठी एक रकमी पैसे नसल्यास त्यांना बँक किंवा खाजगी कंपन्यांकडून लोन घेऊन त्याची फेड करावी लागते. अनेक वेळा यामध्ये अडचणी येतात. याचा व्याज दरही जास्त असतो. यामुळे अनेक दिवसापासून शासनेने कर्मचार्‍यांना वाहन खरेदी साठी अग्रीम देण्याची मागणी कर्मचार्‍यांकडून होत होती. यामुळे शासनाने अखेर ती मागणी मान्य केली आहे. ज्या शाकीय कर्मचार्‍यांचे वेतन बँड मधील मासिक वेतन रु. ८५६0 ग्रेड वेतन वगळून अधिक आहे अशा कर्मचार्‍यांना मोटारसायकल खरेदीसाठी अग्रीम मिळणार आहे. वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या ९ पट एवढी रक्कम किंवा ७0 हाजार रुपये किंवा मोटार सायकलची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेव्हडी अग्रीम मिळणार आहे. अशाच प्रकारे स्कूटर खरेदी करण्यासाठी ही २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याच बरोबर मोपेड खरेदी साठी ही २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सायकल खरेदीसाठी ३ हजार ५00 रुपये देण्यात येणार आहेत. अग्रीम मिळण्यासाठी अर्ज करणार्‍या कर्मचार्‍यांची सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसा झालेली पाहिजे. त्याची सेवा कमीत कमी ५ वर्षाची असली पाहिजे. मात्र या अटीमधून अपंग व्यक्ती ना वगळण्यात आले आहे. ** अग्रीम मिळण्यासाठी कर्मचार्‍यांना वाहन चालवण्याचा परवाना, याच बरोबर वाहन खरेदी करण्याची संपुर्ण कागद पत्रे सादर करावी लागणार आहेत. अग्रीम मिळाल्या नंतर एका महिन्याच्या आत वाहन खरेदी केले पाहिजे. नाहितरमिळालेली रक्कम एक रकमी वसूल करुन त्याची दंड ही वसूल करण्यात येणार आहे. ** अग्रीम मिळण्यासाठी १ मे २00१ नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणार्‍या कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही एक महत्वाची अट या निर्णयामध्ये टाक ण्यात आली आहे.