शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पदमुक्ती रद्द होऊनही गोरेंचे अध्यक्षपद गेले!

By admin | Updated: June 1, 2015 04:41 IST

आधीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) अध्यक्षपदी नियुक्त केलेले जीवनराव विश्वनाथराव

मुंबई : आधीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) अध्यक्षपदी नियुक्त केलेले जीवनराव विश्वनाथराव गोरे यांना मुदतीपूर्वीच पदमुक्त करण्याचा फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला असला तरी यापुढे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद पदसिद्धतेने परिवहनमत्र्यांकडे देण्याचा सरकारचा निर्णय न्यायालयाने वैध ठरविल्याने गोरे यांना अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.तसेच बाबासाहेब देवप्पा मुळीक, मनोहर विष्णू पाशिलकर व आनंदराव यशवंतराव पाटील या आधीच्या सरकारने नेमलेल्या तीन अशासकीय संचालकांची मुदतपूर्व पदमुक्तीही न्यायालयाने रद्द केली. मात्र हा निकाल न्यायालयाने स्वत:च सहा आठवड्यांसाठी स्थगित केल्याने हे तिघे १९ जूनपर्यंत संचालक म्हणून काम करू शकणार नाहीत.गोरे यांची ६ आॅगस्ट २०१२ रोजी व उपयुक्त तीन संचालकांची ६ सप्टेंबर २०१२ रोजी तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. मात्र सत्तांतरानंतर फडणवीस सरकारने या चौघांनाही २२ जानेवारी २०१५पासून पदमुक्त करण्याची एक महिन्याची नोटीस २३ डिसेंबर रोजी दिली. याविरुद्ध आधी गोरे यांनी व नंतर अन्य तीन संचालकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका केल्या. २० जानेवारी रोजी न्यायालयाने गोरे यांच्या याचिकेवर अंतरिम आदेश देऊन त्यांना अध्यक्षपदावर राहू दिले. यानंतर दोनच दिवसांनी सरकारने नियमांत दुरुस्ती करून यापुढे परिवहन मंत्री हेच एस.टी. महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, अशी तरतूद केली. प्रलंबित याचिकांमध्ये या दुरुस्तीसही आवाहन देण्यात आले.न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने या याचिकांवर अंतिम निकाल देताना या चौघांनाही मुदतपूर्व पदमुक्त करण्याचा निर्णय रद्द केला. मात्र महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्षपद परिवहनमंत्र्यांकडे देणारी दुरुस्ती वैध असल्याने गोरे यांना पुन्हा अध्यक्षपद देणे शक्य नाही, असे न्यायालयाने म्हटले. मात्र अंतरिम आदेशामुळे गोरे २० जानेवारीनंतरही अध्यक्षपदी आहेत व उन्हाळी सुट्टीमुळे हे निकालपत्र उपलब्ध व्हायला वेळ लागेल. त्यामुळे गोरेंना दिलेला अंतरिम दिलासा आणखी सहा आठवडे लागू राहील, असे खंडपीठाने म्हटले. मात्र सरकारची विनंती मान्य करून खंडपीठाने अन्य तीन संचालकांना पुन्हा पदावर बहाल करणेही सहा आठवड्यांसाठी (१८ जूनपर्यंत) स्थगित केले.