शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

सोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 6:00 AM

दुबई, अबुधाबी येथून पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातून दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन आणलेल सोने पकडले जाते़...

ठळक मुद्दे एका तोळ्यामागे ५ हजार रुपयांचा फरक

पुणे : भारतातील सोन्याच्या आयातीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन १२ टक्के केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सोन्याचे भाव व भारतातील सोन्याच्या भावात एका तोळ्यामागे किमान ५ हजार रुपयांचे अंतर असल्याने दुबई, अबुधाबीवरुन भारतात सोन्याच्या होणाऱ्या तस्करीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़. हे सोने कोठेही कागदपत्री दाखविले जात नसल्याने त्यातून भष्ट्राचार वाढणार आहे़.दुबई, अबुधाबी येथून पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातून दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन आणलेल सोने पकडले जाते़. अनेकदा हे तस्कर इतके स्मार्ट झाले आहेत की, ते दरवेळी वेगवेगळ्या मार्गाने सोने चोरुन आणत असतात़ सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या हाताला लागलेले हे सोने आहे़. प्रत्यक्षात त्यांच्या नजरेतून सुटलेले किती सोने येते याची कोणतीही माहिती नाही़. दुबई, आबुदाबी येथून येणारी आंतरराष्ट्रीय विमाने पुण्यात आल्यानंतर ती पुढील स्थानिक विमानप्रवासासाठी वापरली जातात़. त्यामुळे अनेकदा तस्कर विमानातच एखाद्या ठिकाणी सोने दडवून ठेवतात व पुण्यात ते उतरुन जातात़ .त्यानंतर पुण्यातून त्यांचे साथीदार पुढच्या प्रवासासाठी बसतात व प्रवासादरम्यान विमानात लपवून ठेवलेले सोने ताब्यात घेतात़. देशांतर्गत प्रवासात प्रवासी उतरल्यानंतर त्यांची तपासणी होत नसल्याने ते सहीसलामत सोने घेऊन निघून जातात़. अशाप्रकारे १६ जूनला स्पाईस जेटच्या वॉश बेसिनच्या खाली लपवून ठेवलेली ५३ लाख रुपयांची ६६३ ग्रॅम वजनाची १४ सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती़. १३ मे रोजी १६ लाख ७१ हजार रुपयांचे ६६४ ग्रॅम सोने पेस्ट स्वरुपात आणण्यात आले होते़. ७ मे रोजी ३१ लाखांचे ९५७ ग्रॅम सोने प्लॅस्टिकच्या बेल्टमध्ये लपवून आणण्यात आले होते़.  १८ मार्च २०१९ रोजी एक पुरुष कमरेच्या प्लॅस्टिकच्या पट्टीमध्ये पेस्ट स्वरुपातील १४ लाख रुपयांचे ५५९ ग्रॅम सोने घेऊन आला होता़. तो सीमा शुल्क विभागाच्या हाती लागला होता़. १५ मार्च २०१९ रोजी ३० लाख रुपयांचे सोने पकडण्यात आले होते़.ज्यांना पैशांची आवश्यकता आहे़ अशांना हे तस्कर हेरतात़ अशा लोकांना ते काम शोधण्यासाठी दुबई, अबुधाबी येथे मुंबई किंवा इतर विमानतळावरुन पाठवितात़. त्यानंतर दोन दिवसांनी ते तस्करीचे सोने घेऊन पुण्यात किंवा गोवा येथे येतात़. अनेकदा ते अशा पद्धतीने सोने घेऊन येतात की विमानतळावरील एक्सरे मशीनमध्येही दिसून येत नाही़. .......सोने तस्करीगेल्या वर्षी एक महिला ग्रीन चॅनेलमधून जात असताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाºयांना संशय आला़. त्यांनी तिला एक्स रेच्या समोरुन जाण्यास सांगितले़ पण तरीही बीप वाजला नाही़. त्यानंतर तिची तपासणी केल्यावर तिने कमरेला बांधलेल्या पट्ट्याच्या आतमध्ये प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये व अंतवस्त्रांमध्ये तब्बल २ किलो ७९१ ग्रॅम सोने पेस्ट स्वरुपात आणले होते़ त्याची किंमत तब्बल ९० लाख रुपये होती़. एखादा तस्कर अर्धा ते एक किलो सोने चोरुन घेऊन आला तर त्याला एका फेरीत काही लाख रुपये मिळू शकतात़. हवाला व्यवहारामार्फत हे पैसे मिडल इस्ट देशात जातात व ते सोन्याच्या तस्करीसाठी वापरले जात आहेत़. सीमा शुल्कामध्ये वाढ झाल्याने सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता आहे, असे सीमा शुल्क अधिकाºयांनी सांगितले़.

भारत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात १२ टक्के सीमाशुल्क व ३ टक्के जीएसटी यामुळे १० ग्रॅममागे तब्बल ५ हजार रुपयांपर्यंतचा फरक पडतो़. त्यातून भष्ट्राचार वाढण्याची शक्यता आहे़ दत्तात्रय देवकर, सचिव महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन...........९५ टन सोने तस्करीतून आले भारतात पूर्वी सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर सीमा शुल्क आकारले जात असल्याने मुंबईतील गुन्हेगारी विश्व या सोने तस्करीतून फोफावले होते़. उदारीकरणानंतर सोन्यावरील सीमा शुल्क कमी कमी करीत आणण्यात आला होता़ त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाव व भारतातील भावात तफावत राहिली नाही़. त्यामुळे ते तस्करी करुन आणणे परवडत नसल्याने मधल्या काळात सोन्याची तस्करी पूर्णपणे बंद झाली होती़. आॅगस्ट २०१३ मध्ये केंद्र सरकारने १० टक्के सीमाशुल्काची आकारणी करण्यास सुरुवात केली़. त्यानंतर ग्रे मार्केटमध्ये तस्करी करुन आणलेल्या सोन्याची रोखीत व्यवहार होऊ लागले़ मुंबई, हैदराबाद, गोवा, पुणे तसेच दिल्ली या ठिकाणी प्रामुख्याने परदेशातून येणाºया आंतरराष्ट्रीय फ्लाईटद्वारे सोन्याची तस्करी केली जाते़. वल्डे गोल्ड कॉन्सिलच्या मते २०१८ मध्ये तब्बल ९५ टन सोन्याची तस्करी करुन भारतात आणण्यात आले़.  आता सीमा शुल्कात आणखी वाढ केल्याने यापुढे सोन्याच्या तस्करीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़.  

टॅग्स :PuneपुणेGoldसोनंPoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीयSmugglingतस्करी