शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीची झाली हत्या; पोलिसांकडे पुरावे

By admin | Updated: June 1, 2015 05:01 IST

चारकोपमधील छत्रपती शिवाजी राजे संकुलात राहणाऱ्या सिम्मी मिस्त्री(२०) या तरुणीची शेजारील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली

मुंबई : चारकोपमधील छत्रपती शिवाजी राजे संकुलात राहणाऱ्या सिम्मी मिस्त्री(२०) या तरुणीची शेजारील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली हे स्पष्ट करणारे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून पोलिसांनी सिम्मीची हत्या झाल्याचा गुन्हा नोंदवून त्याप्रकरणी कन्हैया सिंग या २३ वर्षीय तरूणाला गजाआड केले आहे. बीपीओमध्ये काम करणाऱ्या सिम्मीचा मृतदेह कांदिवलीच्या न्यू म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक ५६च्या आवारात २५ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या चारकोप पोलिसांनी सुरूवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. प्राथमिक चौकशीतून पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला. मात्र सिम्मीचे वडील शंभुप्रसाद यांनी हा अंदाज खोटा ठरवला. . अखेर त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी स्वत:हूनच तपास सुरू केला. ज्या इमारतीच्या आवारात ही घटना घडली तेथे सीसीटीव्ही नव्हते. अन्य इमारतीचे सीसीटीव्ही त्यांनी तपासले. त्यात घटनेच्या दहा मिनिटांपुर्वी सीम्मी व कन्हैया सोबत असल्याचे या सीसीटीव्ही चित्रणातून स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर दोघांच्या हातवाऱ्यांवरून त्यांच्यात वाद सुरू होता, असेही दिसले. हे चित्रण शंभुप्रसाद यांनी पोलिसांसमोर ठेवले आणि या घटनेने वळण घेतले. पोलिसांनीही हे चित्रण पाहून लागलीच कन्हैयाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.न्यायालयाने आरोपी कन्हैयाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. चौकशीत मृत्यूपुर्वी सीम्मीसोबत होतो, त्रिवेणी सोसायटीच्या १५व्या मजल्यावरही गेलो होतो. मात्र मी तिला ढकलले नाही. उलट तिनेच आत्महत्या केली असावी, असे त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. (प्रतिनिधी)