पवारांच्या केंद्राला गिफ्ट

By Admin | Updated: February 13, 2015 01:59 IST2015-02-13T01:59:50+5:302015-02-13T01:59:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेबु्रवारी रोजी बारामतीच्या दौ-यावर येत असून त्यांची ही भेट अधिक सुफळ व्हावी, यासाठी बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राला

Gift to Pawar's Center | पवारांच्या केंद्राला गिफ्ट

पवारांच्या केंद्राला गिफ्ट

नारायण जाधव, ठाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेबु्रवारी रोजी बारामतीच्या दौ-यावर येत असून त्यांची ही भेट अधिक सुफळ व्हावी, यासाठी बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्राला ९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.
ऐन ‘व्हॅलेंटाईन डे’ रोजी होणाऱ्या शरद पवार-मोदी भेटीतून आकारास येऊ घातलेल्या राजकीय मैत्रीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे राज्याचे कृषी खाते एकदम सक्रीय झाले असून कार्यक्रमाची ‘जय्यत’ तयारी सुरू आहे. मोदींचा हा शासकीय दौरा असून त्यातून कोणी राजकीय अर्थ काढू नये, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणत असले, तरी शरद पवारांबद्दल आम्ही अस्पृश्यता पाळत नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मोदींच्या ‘बारामती भेटी’कडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Gift to Pawar's Center