शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

By admin | Updated: June 15, 2014 02:05 IST

एक महिन्यात अहवाल : २२ हजार कोटी रुपयांचा खर्च,ठाण्याची मेट्रो मुंबईशी जोडून ठाणे ते घाटकोपर असा ३१ किलोमीटरचा मार्ग उभारला जाईल

मुंबई - ठाणे शहरात मोनो रेल्वे आणि मेट्रो रेल्वे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प अहवाल व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ठाण्याची मेट्रो मुंबईशी जोडून ठाणे ते घाटकोपर असा ३१ किलोमीटरचा मार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी ठाणे मेट्रोबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राइट्स या केंद्र सरकारच्या कंपनीला आता प्रकल्प अहवालाचे काम देण्यात आले आहे. कंपनीने घाईघाईने अहवाल द्यावा, असा दबाव मी त्यांच्यावर अजिबात आणणार नाही. हा २२ हजार कोटींचा प्रकल्प आहे. लोकांच्या सुरक्षिततेशीही निगडित आहे. त्यात घाई करणे योग्य होणार नाही. अहवाल येताच पुढील कार्यवाही करू. आम्ही मुंबईप्रमाणे ठाणे आणि परिसरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प करणारच, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. शिंदे, सरनाईक, योगेश सागर, सुभाष देसाई, रवींद्र वायकर यांनी ठाण्याबाबत विलंब होत असल्याची तक्रार केली. दरम्यान, रिलायन्सच्या मनमानीचा अनुभव शासनाला येत आहे. त्यामुळे यापुढे प्रकल्पांची मालकी खासगी कंपनीला देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)