शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आला प्रस्ताव, करा मंजूर !

By admin | Updated: June 2, 2015 04:27 IST

पहिल्या दिवशी रेट कॉन्ट्रॅक्ट केले, दुसऱ्या दिवशी ठेकेदाराने आयुक्तांना प्रस्ताव सादर केला, तिसऱ्या दिवशी आयुक्तांनी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आणि त्याच दिवशी महिला व बालविकास विभागाने

अतुल कुलकर्णी , मुंबईपहिल्या दिवशी रेट कॉन्ट्रॅक्ट केले, दुसऱ्या दिवशी ठेकेदाराने आयुक्तांना प्रस्ताव सादर केला, तिसऱ्या दिवशी आयुक्तांनी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आणि त्याच दिवशी महिला व बालविकास विभागाने १ कोटी ८० लाखांच्या प्लास्टिकच्या चटया खरेदी करण्यास मान्यता देऊन टाकली. या अशा गतीने या विभागाने २०६ कोटी ५० लाखांची खरेदी करून टाकली आहे. एखाद्याने पळत पळत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फाईल घेऊन जायचे ठरवले तरीही ती नेता येणार नाही पण या विभागाने विविध खरेदींच्या फायली प्रचंड वेगाने पळवल्या आहेत. हे करत असताना अनेक नियम पायदळी तुडवले गेले. खरेदी केल्या गेलेल्या वस्तूंची मागणी आहे की नाही हा मुद्दाही विचारात घेतला गेला नाही. एवढेच नव्हेतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अशा खरेदींच्या संबंधी केलेल्या भाषणालाही केराची टोपली दाखवत हे सगळे केले गेले.‘‘महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार व प्रधान सचिव संजयकुमार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यापूर्वी पाठवलेले सर्व प्रस्ताव रद्द करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे,’’ असे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी रेकॉर्डवर आणले आहे. १२ फेब्रुवारीला ही बैठक झाली. त्यात हे ठरल्याचे आयुक्त म्हणाले आणि त्यानुसार त्याच दिवशी ती बैठक संपली की लगेच दुसरे प्रस्ताव दिले गेले, आणि १३ फेब्रुवारी रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच ११३ कोटींच्या खरेदीला मान्यताही दिली गेली.उद्योग संचालनालयासोबतचा रेटकॉन्ट्रॅक्ट अंतिम होण्याआधीच म्हणजे ७ ते १२ फेब्रुवारीदरम्यान अनेक प्रकरणांत ठेकेदारांनी खरेदीचे प्रस्ताव आयुक्तांना सादर केले. महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तांनी अशा खरेदीची गरज आहे की नाही याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयांकडून न घेताच खरेदीचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केले आणि ज्या दिवशी प्रस्ताव आले त्याच दिवशी त्याच्या खरेदीचे आदेशही निघण्याचे भाग्य काही ठेकेदारांच्या नशिबी आले!