महाविद्यालयांची सरसकट शुल्कवाढ रद्द

By Admin | Updated: June 3, 2015 05:04 IST2015-06-03T03:28:37+5:302015-06-03T05:04:51+5:30

महाविद्यालय शुल्कवाढीसाठी शुल्कवाढ समितीने जे निकष निश्चित केले आहेत, त्याचे पालन करेपर्यंत कुठल्याही महाविद्यालयांना सरसकट शुल्कवाढ देऊ नये,

The general funding of colleges is canceled | महाविद्यालयांची सरसकट शुल्कवाढ रद्द

महाविद्यालयांची सरसकट शुल्कवाढ रद्द

मुंबई : महाविद्यालय शुल्कवाढीसाठी शुल्कवाढ समितीने जे निकष निश्चित केले आहेत, त्याचे पालन करेपर्यंत कुठल्याही महाविद्यालयांना सरसकट शुल्कवाढ देऊ नये, असे आदेश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढ समितीने सादर केलेल्या २0 टक्के शुल्कवाढीच्या अहवालातील शिफारशीला मंजुरी देण्यात आली होती. शुल्कवाढ समितीने दिलेले निकष अनेक महाविद्यालयांनी पूर्ण केले नसताना त्यांना सरसकट १० टक्के शुल्कवाढ देण्याच्या निर्णयाला मंजुरी देणे चुकीचे असल्याने युवा सेनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महाविद्यालयांना सरसकट २0 टक्के शुल्कवाढ देण्याचा व्यवस्थापन परिषदेचा निर्णय रद्द करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले. शुल्कवाढ समितीने निश्चित केलेले निकष पूर्ण केलेल्या महाविद्यालयांनी शुल्कवाढीसाठी विद्यापीठाकडे अर्ज मागवून त्यांची तपासणी झाल्यावर महाविद्यालयांच्या शुल्कवाढीला मंजुरी द्यावी, अशी सूचना वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Web Title: The general funding of colleges is canceled