शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत निघणार गजानन महाराजांची पालखी

By admin | Updated: August 20, 2014 00:37 IST

माऊली झाली ‘ग्लोबल’!, ऋषीपंचमीनिमित्त आयोजन

बुलडाणा : विदर्भाची पंढरी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांचा भक्तसंप्रदाय जगभर पसरला आहे. या भक्त मंडळीच्या माध्यमातून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा यंदा अमेरिकेतही होणार असून, त्यासाठी साता समुद्रापार असलेल्या श्रींच्या भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.अमेरिकेतील केलीफोर्नियामध्ये संत गजानन महाराजांवर ङ्म्रद्धा असलेल्या भक्तांनी संत गजानन महाराज अमेरिका परिवार नावाची संस्था स्थापन केली आहे. यामध्ये अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रासह देशभरातील भक्तांचा समावेश आहे. हा परिवार संत गजानन महाराजांच्या नावाने विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर साजरे करीत असतो. येत्या ३0 ऑगस्ट रोजी, ऋषी पंचमीला संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असून, या सोहळयाच्या अनुषंगानेच ७ सप्टेंबर रोजी ङ्म्रींची पालखी निघणार आहे. तेथील हायरेस्ट सर्कल, इर्विन सेंट्रल येथून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता २ किलोमीटरच्या परिक्रमेत ही पालखी निघणार असून, यावेळी भक्तांकडून गण गण गणात बोतेचा गजर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सोहळयानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे. संत गजानन महाराज, अमेरिका परिवारची वेबसाईट आणि फेसबूक पेजवर या सोहळय़ाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या परिवारातील योगेश जाधव हे परभणी जिल्ह्यातील उकडगावचे मूळ रहिवासी असून, ते आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. गजानन महाराजांप्रती येथील भारतियांमध्ये अपार ङ्म्रद्धा असून, विविध धार्मिक उत्सव भारताप्रमाणेच आम्ही येथेही साजरे करतो. संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळयात किमान २00 भक्त सहभागी होतील, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्त केला आहे.