शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या निधी सेताची उत्तुंग भरारी

By admin | Updated: June 23, 2014 01:11 IST

‘मला नेहमीच्या चाकोरीपलीकडे काहीतरी वेगळे करायला आवडते. मी गडचिरोलीतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पॉवर प्लॅन्ट विद्या शाखेतून घेतले.

हवाई दलात अधिकारी बनणार : संरक्षण दलात जिल्ह्याला प्रथमच मानगडचिरोली : ‘मला नेहमीच्या चाकोरीपलीकडे काहीतरी वेगळे करायला आवडते. मी गडचिरोलीतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण पॉवर प्लॅन्ट विद्या शाखेतून घेतले. ज्या क्षेत्रात मला काहीतरी ठोस करून दाखविता येईल, माझ्या गुजराती कुटुंबातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आजवर कुणीही संरक्षण दलात रूजू झाले नाही. हवाई दलात एरॉनॉटिकल इंजिनीअर म्हणून दाखल होताना मला प्रचंड औत्सुक्य आणि सार्थ अभिमानही आहे.’ हे उद्गार आहेत, मागास गडचिरोलीच्या निधी सेता या २३ वर्षीय युवतीचे!हवाई दलाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी हवाई दलाच्या तांत्रिक शाखेच्या एरॉनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल) च्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा निकाल जाहीर झाला. या पदासाठी देशभरातून निवडल्या गेलेल्या तीन महिलांमध्ये गडचिरोलीच्या निधी सेता या युवतीने मानाचे स्थान मिळविले आहे. हैदराबाद, डुंडीगल येथील एअर फोर्स अ‍ॅकॅडमीत निधी सेता ही ५ जुलै रोजी रूजू होणार आहे. हवाई दलात अधिकारी बनण्यासाठी युवा वर्गाला हवाई दलाची सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यासाठी निधी सेता हिने आॅगस्ट २०१३ मध्ये अर्ज सादर केला. तीने लेखी परीक्षा म्हैसूर येथे दिली. त्यानंतर ए.एफ.एस.बी. मुलाखत आणि त्यानंतर ती वैद्यकीय परीक्षेतही उत्तीर्ण झाली आहे. एरॉनॉटिकल इंजिनीअरिंगच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी देशभरातून १२ पुरूष आणि तीन महिलांची निवड झाली आहे. हैदराबाद येथे रूजू झाल्यानंतर त्यांना लगेचच फ्लाइंग आॅफिसर ही रँक मिळेल आणि ७ जुलैपासून हैदराबाद येथे सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि बेंगलुरू येथे दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करणार असल्याचे निधी सेता हिने लोकमतला सांगितले.निधी सेता ही सध्या येथील पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करते. जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिक क्षेत्रामध्ये करिअर घडविले आहे. जिल्ह्याच्या युवतींनी नेहमीच्या क्षेत्राशिवाय आव्हानात्मक क्षेत्रात करिअर घडवावे, असेही निधी सेता हिने सांगितले. माझ्या यशाने गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याचा मान वाढला असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही निधी सेता हिने सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)