न्यायालयावर विक्रोळीच्या भूखंडाचे भवितव्य

By Admin | Updated: March 31, 2015 04:31 IST2015-03-31T03:53:40+5:302015-03-31T04:31:23+5:30

: मालकी हक्काचा वाद सुरु असतानाही विक्रोळी येथील भूखंड दोनशे कोटी रुपयांना खरेदी करण्याचा प्रशासनाचा घाट सुधार समितीने सोमवारी उधळून

Future of Vikhroli plot on the court | न्यायालयावर विक्रोळीच्या भूखंडाचे भवितव्य

न्यायालयावर विक्रोळीच्या भूखंडाचे भवितव्य

मुंबई : मालकी हक्काचा वाद सुरु असतानाही विक्रोळी येथील भूखंड दोनशे कोटी रुपयांना खरेदी करण्याचा प्रशासनाचा घाट सुधार समितीने सोमवारी उधळून लावला़ सदस्यांनी फैलावर घेताच १२,६६२ चौ़मी़ च्या या भूखंडाचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयापर्यंत लांबणीवर टाकला आहे़
१९९३ मध्ये विकास नियोजन आराखड्यात हा भूखंड निवासी क्षेत्रासाठी आरक्षित केला़ मात्र मेसर्स गोदरेज अ‍ॅण्ड बॉईज मॅन्युफेक्चरींग या कंपनी या भूखंडावर मालकी हक्क सांगितला आहे़ परिणामी हा वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे़दरम्यान जमिनीचे दोनशे कोटी कंपनीने मागितले आहेत. मात्र आज सुधार समितीत खडाजंगी नंतर प्रशासनाने तसा प्रस्ताव मागे घेतला़

Web Title: Future of Vikhroli plot on the court