शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी निधी द्या अन्यथा भाविकांवर निर्बंध

By admin | Updated: November 8, 2014 03:49 IST

पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा

मुंबई : पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने व येथील महापालिकेने मागणी केलेला निधी केंद्र शासनाने तात्काळ द्यावा अन्यथा येथे येण्याऱ्या भाविकांना निर्बंध घालावे लागतील, असा इशारा शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला़दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा होतो़ २००३मध्ये येथे कुंभमेळा झाला होता व आता पुढील वर्षी येथे हा मेळा होणार आहे़ कुंभमेळ्याला देशभरातील भाविक या नदीत आंघोळ करतात व येथील पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात़ मात्र या नदीत सांडपाणी व औद्योगिक कंपन्यांचे प्रदूषित पाणी सोडले जाते़ यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे़ परिणामी पुढील वर्षीच्या कुंभमेळ्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला याने धोका होऊ शकतो़ तसेच याच नदीच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे़ तेव्हा या नदीत सांडपाणी व कंपन्यांचे पाणी सोडण्यास मज्जाव करावा व ही नदी स्वच्छ करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राजेश मधुकर पंडित व इतरांनी अ‍ॅड़ प्रवर्तक पाठक यांच्यामार्फत दाखल केली आहे़तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने या नदीजवळील भूखंड ताब्यात घेऊन तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीने अ‍ॅड़ वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत दाखल केली आहे़या याचिकांवर न्या़ अभय ओक व न्या़ अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली़ त्यात नाशिक महापालिका व राज्य शासनाने ही नदी स्वच्छ करण्यासाठी व येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्राकडे सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे़ पण अजून हा निधी मिळाला नसल्याचे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ (प्रतिनिधी)