एफटीआयआयचा तिढा सुटला?

By Admin | Updated: September 3, 2015 00:58 IST2015-09-03T00:58:52+5:302015-09-03T00:58:52+5:30

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती रद्द करावी,

FTII was released? | एफटीआयआयचा तिढा सुटला?

एफटीआयआयचा तिढा सुटला?

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा ‘सूर’ आता काहीसा बदलला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारशी तडजोड केल्याची माहिती मिळाली आहे. चौहान यांना आठ महिन्यांसाठी नियुक्त करणे आणि इतर चार सदस्यांना वगळणे या मुद्द्यांवर सरकार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एकमत झाले असून, यासंदर्भात शासनाने लेखी आश्वासन अद्याप दिले नसल्याने संप मागे घेण्याचे ‘घोडे’ अडल्याचे समजते. तब्बल ८४ दिवस चालू ठेवलेल्या आंदोलनादरम्यान अरूण जेटली यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची बैठक झाली होती.

Web Title: FTII was released?