शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

‘एफटीआयआय’च्या प्रश्नावर विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा!

By admin | Updated: September 30, 2015 02:24 IST

एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीची मंगळवारी मुंबईत विद्यार्थी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

पुणे : एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीची मंगळवारी मुंबईत विद्यार्थी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने १ आॅक्टोबरला मंत्रालयाची समिती आणि विद्यार्थ्यांत पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ रंगणार आहे. गुरुवारी अंतिम मार्ग निघण्याची शक्यता आहे. गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करावी आणि एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचा सोमवारी ११० वा दिवस होता. मंत्रालयाच्या वतीने चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. त्यानंतर पहिल्यांदा मुंबईत त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये काहीशी सकारात्मक चर्चा झाली. बैठकीतून अंतिम तोडगा निघेल, असे वाटले होते. मात्र झाली केवळ चर्चाच! एफटीआयआयच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने संजय गुप्ता (सहसचिव-चित्रपट), दीपक शर्मा (उपसचिव) व मुकेश शर्मा (फिल्म डिव्हिजन संचालक, मुंबई) यांच्या समितीसमोर मागण्या मांडल्या. हरीशंकर नच्चिमुथ्थु, विकास अर्स, रणजीत नायर, रीमा कौर, मालयाज अवस्थी, अजयन अडाट, शायनी जी. के. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने समितीबरोबर चर्चा केली. समितीने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन स्वत:ची मते स्पष्ट केली. आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी काय तोडगा काढता येईल, यासंदर्भातील पुढील चर्चा १ आॅक्टोबरला फिल्म डिव्हिजनमध्ये होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)