भाजपाच्या जागांवर मित्रपक्षांचे अर्ज

By Admin | Updated: September 28, 2014 02:31 IST2014-09-28T02:31:26+5:302014-09-28T02:31:26+5:30

भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत.

Friendly application for BJP seats | भाजपाच्या जागांवर मित्रपक्षांचे अर्ज

भाजपाच्या जागांवर मित्रपक्षांचे अर्ज

>मुंबई : भारतीय जनता पार्टीने आपले 261 उमेदवार जाहीर केले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी व शिवसंग्राम या पक्षांना 27 जागा सोडण्यात आलेल्या आहेत. परंतु या मित्रपक्षांनी अर्ज दाखल करण्याबाबत केलेले दावे पाहिले तर भाजपाच्या वाटय़ाच्या किमान सात जागांवर मित्रपक्षांनी अर्ज केले आहेत. पुढील दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
भाजपाच्या नेत्यांबरोबर शनिवारी रिपाइंच्या रामदास आठवले यांची बैठक झाली. त्यांना आठ जागा सोडण्याचा निर्णय झाल्याचे व केंद्रात मंत्रीपदासह राज्यातील सत्तेत 1क् टक्के वाटा देण्याचे निश्चित झाल्याचे आठवले यांनी सांगितले.        
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, इस्लामपूर, कराड उत्तर आदि 15 मतदारसंघात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीला मांड, दौंड, भूम-परांडा, गंगाखेड, कळमनुरी, देगलूर, पैठण, कन्नड, पारनेर, इंदापूर हे मतदारसंघ सुटल्याचे त्या पक्षाने सांगितले. 
 
आठवले यांना चेंबूर, विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पुणो कॅन्टॉनमेंट, मुंब्रा, अंबरनाथ, देवळाली व भांडूप या आठ जागा सोडण्यात आल्याचे त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले. याखेरीज अंधेरी पूर्व मतदारसंघातून रिपाइंच्या वतीने एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी अर्ज केला असून तेथे भाजपाने उमेदवार दाखल केला आहे. 

Web Title: Friendly application for BJP seats