शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलावर कारवाईचा मार्ग मोकळा, रहिवाशांचा विरोध मावळला

By admin | Updated: June 22, 2014 18:07 IST

कॅम्पाकोलावासियांचा विरोध मावळल्याने गेल्या दीड वर्षांपासून रेंगाळलेल्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२- 'गेल्या १८ महिन्यांपासून आम्ही आमचे घर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहोत.सोसायटीतील सर्वच रहिवासी मानसिक तणावाखाली असून हे सर्व बघवत नाही. आता आम्ही आणखी लढणार नाही असे सांगत कॅम्पाकोलावासियांनी महापालिकेच्या कारवाईला सामोरे जायची तयारी दर्शवली आहे. महापालिकेच्या पथकाला कारवाईसाठी प्रवेशद्वार खुले असून त्यांनी कधीही कारवाई करावे असे रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. 
गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेचे पथक अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कॅम्पाकोलात जात आहे. मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे महापालिकेला कारवाई करता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी आ. बाळा नांदगावकर, शायना एन सी आणि इमारतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर रहिवाशांचा विरोध मावळला आहे. 'गेली १८ महिने आम्ही सिस्टमविरोधात लढत होतो. आता आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच संघर्ष करु' असे इमारतीतील रहिवासी आशिष जालान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिका-यांची माफी मागत जालान म्हणाले, आम्हाला त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नव्हता किंवा सुप्रीम कोर्टाचाही अवमान करायचा नव्हता. आम्हाला घर वाचवायचे होते. पण हा संघर्ष आता थांबवण्याची गरज आहे. महापालिकेला कारवाई करण्यासाठी आमचे प्रवेशद्वार खुले आहेत. मात्र त्यांनी उद्यापासून कारवाई केल्यास बरे होईल. 
पूनर्बांधणी, वाढीव एफएसआय असे तीन ते चार पर्याय आमच्याकडे असून यापैकी कोणता पर्याय आम्हाला स्वीकारता येईल यासााठी महापालिका व सरकारचा सल्ला घेऊ असेही त्यांनी नमूद केले. रहिवाशांचा विरोध मावळल्याने आता महापालिका इमारतीतील १०२  अवैध बांधकामांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडेल. यात दिवस लागतील. त्यांनतर इमारतीवर प्रत्यक्ष हातोडा मारण्याची कारवाई सुरु होईल. मात्र कधी हातोडा मारला जाईल हे अद्याप ठरलेले नाही.